Home /News /national /

लॉकडाऊन 3 मध्ये दारुच्या किंमतीत मोठी वाढ, दिल्ली नाही तर ‘या’ राज्यात विकली जातेय सर्वात महाग दारू

लॉकडाऊन 3 मध्ये दारुच्या किंमतीत मोठी वाढ, दिल्ली नाही तर ‘या’ राज्यात विकली जातेय सर्वात महाग दारू

दारुचे भाव वधारले असले तरी दुकानांबाहेर मद्यपींनी मोठी गर्दी केली होती

    नवी दिल्ली, 5 मे :  देशात कोरोना व्हायरसची (Coronavirus) साखळी तोडण्यासाठी गेल्या 41 दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. या तिसऱ्या टप्प्यात काही ठिकाणी सूट देण्यात आली आहे. अर्थव्यवस्था (Economy) सुरळीत करण्यासाठीही सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. सरकारने दारुच्या दुकानांना (Liquior Shop) काही नियमांवर खुली करण्याची परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सूटनंतर आता राज्य सरकारने दारुच्या नव्या किंमतींची वसुली करण्यात सुरुवात केली आहे. दिल्लीप्रमाणे आता आंध्रप्रदेश सरकारने दारुच्या किंमतीत 75 टक्क्यांनी वाढ केली आहे. आंध्रप्रदेश सरकारने जारी केलेल्या या दारुंच्या किंमतीनंतर आता देशात सर्वात महाग दारू या राज्यात विकली जात असल्याचे दिसून येत आहे. दारुच्या किंमतीत वाढ असली तरी मद्यपी मात्र रांग लावून खरेदी करीत असल्याचे चित्र आहे. रविवारी आंध्रप्रदेश सरकारने दारूच्या किंमतीत 25 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर मंगळवारी यामध्ये 50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. आता दारुच्या एकूण एमआरपीवर 75 टक्के अधिक किंमतीने दारू विकली जात आहे. मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात घोषणा केली. हा 70 टक्के टॅक्स कोरोनाच्या संकटासाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.  दारुची दुकाने सुरू करताच पहिल्याच दिवशी अनेक राज्यांना 200 कोटी रुपयांहून जास्त रक्कम जमा झाली आहे. देशभरात दारुची दुकाने सुरू झाल्यानंतर दुकानांबाहेर मोठी गर्दी जमा होत आहे. अनेकांनी सरकारच्या या निर्णयावर राग व्यक्त केला आहे. संबंधित -एका दिवसात दारू विक्रीतून किती महसूल जमा? आश्चर्यकारक आकडेवारी आली समोर काय म्हणायचं याला! वाईन शॉपमध्ये घुसला आणि 95 हजारांची दारू घेऊनच पडला बाहेर  
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या