Home /News /national /

माओवाद्यांची मोठी टोळी 'तिसऱ्या डोळ्यात' कैद, पाहा हा VIDEO

माओवाद्यांची मोठी टोळी 'तिसऱ्या डोळ्यात' कैद, पाहा हा VIDEO

या भागातल्या घनदाट जंगलात असलेला नाला पार करुन माओवादी जात होते.

छत्तीसगड, 14 सप्टेंबर :  छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात  सुरक्षा दलांच्या ड्रोन कॅमेऱ्यात माओवाद्यांच्या हालचाली कैद झाली आहे. माओवाद्यांची मोठी टोळी या कॅमेऱ्यात दिसून आली आहे. सुकमा जिल्ह्यात पालोदी भागात मोठ्या संख्येने माओवादी स्थानिक समर्थक नागरीकांना सोबत घेऊन रस्ता कापण्यासाठी जात असताना पोलिसांच्या ड्रोन कॅमेऱ्याने या हालचाली टिपल्या आहेत. या भागातल्या घनदाट जंगलात असलेला नाला पार करुन माओवादी जात होते. दरम्यान, मागील आठवड्यात बिजापूर (Bijapur) जिल्ह्यात मेटपाल आणि पुसनार गावातून 26 नागरिकांचे माओवाद्यांनी अपहरण केल होते. यात चौघांची हत्या केली असून 16 नागरिक अजूनही माओवाद्यांच्या ताब्यात आहेत. दंतेवाडा जिल्ह्यात गुरुवारी माओवाद्यांनी दोन जणांची हत्या केली होती. तसंच बिजापूर येथील कुटरू येथून एएसआय (ASI) नागैय्या कोरसा यांची माओवाद्यांनी हत्या केली. माओवाद्यांनी दोन दिवसांपूर्वी कोरसा यांचं अपहरण केले होते. कोरसा हे पोलीस स्टेशनमधून सुट्टी घेऊन घरी गेले होते, त्यानंतर माओवाद्यांनी त्यांचं अपहरण केलं होतं. माओवाद्यांनी कोरसा यांची हत्या करून मृतदेह हा रस्त्यावर फेकून दिला होता. त्यानंतर बिजापूर जिल्ह्यात जनअदालत भरवून माओवाद्यांनी ठार केलेल्या चार आदिवासी नागरिकांचे मृतदेह जवानांनी तब्बल वीस किलोमीटरचा पायी प्रवास करून सुरक्षित पोहोचले. विशेष म्हणजे यावेळी जवानांना तुडुंब वाहणारी नदी पार करून यावं लागलं होतं.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या