मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोना, मंकीपॉक्स आता नव्या लँग्या व्हायरसचं टेन्शन; चीनमध्ये 35 जणांना लागण, जाणून घ्या किती धोकादायक

कोरोना, मंकीपॉक्स आता नव्या लँग्या व्हायरसचं टेन्शन; चीनमध्ये 35 जणांना लागण, जाणून घ्या किती धोकादायक

चीनच्या शेडोंग आणि हेनानमध्ये लँग्या हेनिपा व्हायरसचा संसर्ग झालेल्या 35 पैकी 26 प्रकरणांमध्ये ताप, चिडचिडेपणा, खोकला, भूक न लागणं (Anorexia), स्नायूंमध्ये वेदना (Myalgia), डोकेदुखी, उलटी यासारखी लक्षणं असल्याचं समोर आलं.

बीजिंग, 10 जून : चीनमधील वुहानमध्ये आढळलेल्या कोविड -19 विषाणूने जगभरात खळबळ माजवली. आता झूनोटिक लँग्या (Zoonotic Langya) या विषाणूचा 35 जणांना संसर्ग झाल्याने चीनमध्ये धास्ती वाढली आहे. ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या शेडोंग आणि हेनान प्रांतातील व्यक्तींमध्ये नव्या प्रकारातील हेनिपा व्हायरस लँग्या या विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. हेनिपा व्हायरसला लँग्या हेनिपा व्हायरस म्हणजेच एलएव्ही असंही म्हटलं जातं. पूर्व चीनमध्ये ताप आलेल्या रुग्णांच्या घशातून घेतलेल्या नमुन्यांमध्ये तो आढळला आहे. नव्याने शोध लागलेला हेनिपा व्हायरस प्राण्यांकडून माणसांमध्ये आल्याची शक्यता असल्याचं या संशोधनात सहभागी झालेल्या वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. याचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये ताप, थकवा, खोकला, अस्वस्थतता, उलटीसह इतर काही लक्षणं दिसून येतात. शेडोंग आणि हेनानमध्ये लँग्या हेनिपा व्हायरसचा संसर्ग झालेल्या 35 पैकी 26 प्रकरणांमध्ये ताप, चिडचिडेपणा, खोकला, भूक न लागणं (Anorexia), स्नायूंमध्ये वेदना (Myalgia), डोकेदुखी, उलटी यासारखी लक्षणं असल्याचं समोर आलं. सध्या हेनिपा व्हायरससाठी कुठलीही प्रतिबंधात्मक लस किंवा उपचार नाहीत. योग्य ती काळजी घेणं हा एकमात्र उपचार असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तज्ज्ञांच्या मते, आता या विषाणूला घाबरण्याची गरज नाही. या विषाणूकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. Benefits Of Reading : तुम्हाला माहितीये? पुस्तक वाचल्याने वाढते आयुष्य आणि मेंदू होतो मजबूत
ड्युक-एनयूएस मेडिकल स्कूलमधील संसर्गजन्य आजारासंबंधी अभ्यास सुरू असलेल्या कार्यक्रमातील प्राध्यापक वांग लिनफा यांनी लँग्या हेनिपा व्हायरससंदर्भात म्हटलं आहे की, लँग्या हेनिपा व्हायरसची आतापर्यंतची प्रकरणं पाहिली असता तो घातक किंवा गंभीर परिणाम करेल असं वाटत नाही. त्यामुळे आताच घाबरण्याची गरज नाही. पण एक इशारा म्हणून याकडे पहावं. कारण निसर्गात अनेक प्रकारचे विषाणू अस्तित्वात असून, माणसांमध्ये त्यांचा संसर्ग वाढून अनेक भीतीदायक परिणाम पाहायला मिळाले आहेत. याचा फटका संपूर्ण जगालाही बसला आहे.
चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले. आजही भारतासह विविध देशांत याचे रुग्ण सापडतच आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवताना विविध सरकारं आणि प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोरोना नियंत्रणात येत नाही तोच जगावर मंकीपॉक्सचं संकट समोर उभं ठाकलं आहे. संसर्गजन्य आजारांवर लस किंवा उपचारांचा शोध लागेपर्यंत याचा वेगाने प्रसार होतो आणि नागरिकांच्या आरोग्यासह देशालाही आर्थिक फटका बसत आहे. कोरानाने जगणे मुश्किल केलं असताना लँग्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी काळजी घेण्याचं आवाहन आता तज्ज्ञांकडून केलं जात आहे.
First published:

Tags: China, Coronavirus, Virus

पुढील बातम्या