• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • मेट्रो स्टेशनवरचा अजब नजारा, माकडांना हाकलतायत वानरं; फोटो पाहून कळेल सत्य

मेट्रो स्टेशनवरचा अजब नजारा, माकडांना हाकलतायत वानरं; फोटो पाहून कळेल सत्य

मेट्रो स्टेशनवर (Langur cutouts at Lucknow metro station to make monkeys fear) उच्छाद मांडणाऱ्या माकडांना हुसकावून देण्यासाठी आता वानरांना पाचारण करण्यात आलं आहे.

 • Share this:
  लखनऊ, 31 ऑक्टोबर: मेट्रो स्टेशनवर (Langur cutouts at Lucknow metro station to make monkeys fear) उच्छाद मांडणाऱ्या माकडांना हुसकावून देण्यासाठी आता वानरांना पाचारण करण्यात आलं आहे. वास्तविक, माकडं (Problem of monkey) अनेक ठिकाणी उपद्रव करताना दिसतात. शेतापासून वेगवेगळ्या मॉलपर्यंत अनेक ठिकाणी माकडं घुसखोरी करतात आणि उपस्थितांची पंचाईत करतात. अनेकदा ती घरात घुसतात, तर कधी घराच्या छतावरून जोरदार उड्या (Monkey troubles) मारत गोंधळ घालतात. सध्या असाच गोंधळ माकडांनी घातलाय मेट्रो स्टेशनवर. मेट्रोवर माकडांचा उच्छाद उत्तर प्रदेशमधील लखनऊमध्ये मेट्रो स्टेशनवर गेल्या काही महिन्यांपासून माकडं गर्दी करत आहेत. अनेकदा प्रवाशांच्या हातातील खाद्यपदार्थ ते हिसकावून घेतात. मेट्रो स्टेशनवर खाद्यपदार्थ मिळत असल्यामुळे माकडांची संख्या वाढत चालली आहे. या माकडांना पकडण्याचा प्रयत्न मेट्रो स्टेशनवरील काही कर्मचाऱ्यांनी केला. अनेकांनी माकडांना हुसकावून लावण्याचे उपायही केले. मात्र माकडं त्याला दाद देत नसल्याचा अनुभव आला. अनेकदा कर्मचाऱ्यांच्याच अंगावर माकडं हल्ला करत असून काही कर्मचारी जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या. प्रशासनाची अनोखी शक्कल माकडांना हुसकावण्यासाठी मेट्रो प्रशासनानं एक शक्कल शोधली. मेट्रो स्टेशनवर वानरांच्या आवाजाच्या क्लिप लावायला सुरुवात केली. आक्रमक झालेल्या आणि चिडलेल्या वानरांचा आवाज ऐकून माकडं बिथरायची आणि मेट्रो स्टेशनवरून पळून जायची. मात्र काही दिवसांतच त्याचाही परिणाम होत नसल्याचं दिसून आलं. मग माकडांच्या आवाजासोबत फोटोही लावण्याचा निर्णय झाला. हे वाचा- NCB ला दिलेले वचन Aryan Khan ने पाळले? २४ तासांत उचललं मोठं पाउल फोटोंचा झाला परिणाम लखनऊ मेट्रोच्या प्रत्येक स्टेशनवर वानरांचे कटआऊट्स लावण्यात आले आहेत. कट आऊट्स आणि वानरांचा आवाज यांचा एकत्रित परिणाम होऊन माकडं घाबरतात आणि पळून जातात, असा अनुभव अधिकाऱ्यांना आला. त्यानंतर आता नियमित हा प्रयोग केला जात असून माकडांचा त्रास कमी झाला आहे. शेवटी माकडांना हुसकावून लावण्यासाठी वानरांनाच बोलवावं लागल्याची चर्चा लखनऊमध्ये रंगली आहे.
  Published by:desk news
  First published: