जम्मू आणि काश्मीरमध्ये भुस्खलन, 7 जण ठार,30 जखमी

जम्मू काश्मीरच्या रियासीमध्ये सियाड बाबा या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात सात जण जागीच ठार झाले. तर 30 हून अधिक लोक गंभीर झाले.

News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2018 06:27 PM IST

जम्मू आणि काश्मीरमध्ये भुस्खलन, 7 जण ठार,30 जखमी

जम्मू , १५ जुलै : जम्मू काश्मीर मधलं प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेलेल्या सियाड बाबा या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात सात जण जागीच ठार झाले. तर 30 हून अधिक लोक गंभीर झाले. अचानक झालेल्या भूस्खलनाने हा अपघात झाला अशी प्रार्थमिक माहिती आहे.सियाड बाबा जे जम्मू काश्मीर मधलं एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.इथे पर्यटक आपल्या कुटुंबासोबत फिरायला जातात. वैष्णव देवीच्या दर्शनासाठी जाणारे काही भक्त तिथे स्नान करण्यासाठी पण येतात. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहिती नुसार अपघातातील मृतांची ओळख अजून पटलेली नाही. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

एनडीआरएफ आणि बचाव पथक ढिगारा उपसण्याचे काम करत असून ठिगाऱ्याखाली अजुन काही लोक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रस्ते खराब असल्याने बचाव पथकाला अपघातस्थळी जाण्यासाठीही अडचणी येत आहे. प्रशासनानेही सर्व मदत करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हेही वाचा...

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, शव कटरनं कापून बाहेर काढण्याचा प्रयत्न

‘स्वाभिमानी’चे दुध आंदोलन पेटले; टँकर जाळण्याचा प्रयत्न!

Loading...

तुकोबांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण

ट्विंकलनं अक्षय कुमारबद्दल असं काय म्हटलं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2018 06:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...