मोठी बातमी! केरळमधील भूस्खलनात 80 मजूर अडकले, 5 जणांचा मृत्यू

मोठी बातमी! केरळमधील भूस्खलनात 80 मजूर अडकले, 5 जणांचा मृत्यू

भूस्खलन झालेल्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

तिरुअनंतरपुरम, 07 ऑगस्ट : मुसळधार पावसानं इडुकी जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. एका क्षणात डोळ्या देखत अख्खी वस्ती जमीनदोस्त झाली. जवळपास 80 हून अधिक मजूर राहात असणाऱ्या ठिकाणी मोठी भूस्खलनाची दुर्घटना घडली आहे. या भूस्खलनात 80 हून अधिक मजूर दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान आतापर्यंत या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन व्यवस्थापन आणि NDRF, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून आतापर्यंत 10 जणांना रेस्क्यू करण्यात आलं आल्याची माहिती मिळाली आहे.

हे वाचा-क्षणात झालं होत्याचं नव्हतं..घरावरील छत उडाल्यानं शेवंताबाईंचा संसार उघड्यावर!

ज्या ठिकाणी भूस्खलन झालं तिथे चहाच्या बागेत काम करणारे मजूर राहात असल्याची माहिती मिळाली आहे. या परिसरात मजुरांची मोठी वस्ती होती. भूस्खलनानंतर एका क्षणात सर्व घरं जमीनदोस्त झाली. यापैकी बहुतेक मजूर तमिळनाडूचे असल्याचंही सांगितलं जात आहे.

भूस्खलन झालेल्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. तर मुसळधार पावसामुळे केरळमध्ये घडलेल्या या मोठ्या दुर्घटनेत रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अडथळे येत असल्याची माहिती मिळाली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 7, 2020, 2:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading