Home /News /national /

...आणि डोळ्यादेखत कोसळला भलामोठा डोंगर, भूस्खलनाचा LIVE VIDEO

...आणि डोळ्यादेखत कोसळला भलामोठा डोंगर, भूस्खलनाचा LIVE VIDEO

भूस्खलनामुळे मातीचा ढीग बद्रीनाथ मार्गावर आला. या मातीच्या ढिगाऱ्याला हटवण्याचं काम सुरू आहे.

    देहरादून (उत्तराखंड) 31 जुलै: उत्तराखंडमधील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. राज्यात अनेक ठिकाणी भूस्खलन आणि ढगफुटीच्या घटनाही समोर येत आहेत. देहरादून, चमोली, हरिद्वार, रुद्रप्रयाग, पौरी जिल्ह्यात 31 जुलै आणि 1 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, चामोली जिल्ह्यात दरडी कोसळल्या असून त्यामुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. चमोली जिल्ह्यातील बाजपूरमधील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दरड कोसळली. मुसळधार पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं. या भूस्खलनाचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेदरम्यान काही लोकंही तिथे उपस्थित होते. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भूस्खलनामुळे मातीचा ढीग बद्रीनाथ मार्गावर आला. या मातीच्या ढिगाऱ्याला हटवण्याचं काम सुरू आहे. या परिसरात मागच्या काही दिवसांपासून भूस्खलनाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. कुठे रस्ते वाहून जात आहेत तर कुठे भूस्खलन अशा अस्मानी संकटांचा सामना करताना उत्तराखंडमधील आमदार अडकले होते. त्यांना स्थानिकांनी सुखरुपपणे रेस्क्यू केलं आहे. हे वाचा-CCTV VIDEO: हम तो उड गये! हवेत उडून महिलेवर आदळला रिक्षा चालक उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे नदी व नाले तुंबले आहेत. पिथौरागडमध्येही गुरुवारी कॉंग्रेसचे आमदार हरीश धामी हे मुसळधारपावसामुळे अडकडे. अचानक नदीचं पाणी वाढू लागल्यानं ते अडकले. मात्र स्थानिक आणि काही तरुणांनी त्यांना रेस्क्यू केलं.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Uttarkhand

    पुढील बातम्या