Home /News /national /

बापरे बाप! कामगारांच्या डोळ्यांदेखत राक्षसी भूस्खलन, खाणीत दरड कोसळल्याचा Live Video

बापरे बाप! कामगारांच्या डोळ्यांदेखत राक्षसी भूस्खलन, खाणीत दरड कोसळल्याचा Live Video

एका खाणीच्या (mine) परिसरात भूस्खलन (Landslide) होऊन अख्खा कडा (sand and stones) खाणीत कोसळला आहे. अचानक झालेल्या या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला.

  जयपूर, 28 जुलै : एका खाणीच्या (mine) परिसरात भूस्खलन (Landslide) होऊन अख्खा कडा (sand and stones) खाणीत कोसळला आहे. अचानक झालेल्या या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला. राजस्थानमधील (Rajasthan) भिलवाडा (Bhilwada) जिल्ह्यातील बदनोर परिसरात असलेल्या खाणीत कामगार काम करण्यासाठी चालले होते. मात्र त्यांना जमीन हलत असल्याची जाणीव झाल्यामुळे ते खाणीपासून काही अंतरावर थांबले. त्यानंतर काही क्षणांतच जोरदार भूस्खलन होऊन लाखो टन दगडमाती खाणीत कोसळले आणि खाण जवळपास बुजली. वाचले अनेक जीव या खाणीत काम करणारे कामगार खाणीच्या बाहेर असल्यामुळेच अनेकांचे जीव वाचले. या खाणीत ठेवलेली कटर्स आणि मशिन्स मात्र मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. ही घटना घडली, त्याच्या काही वेळ अगोदरच हे कामगार खाणीमध्ये जाऊन काम सुरू करणार होते. मात्र त्यातील काही कामगारांना जमिनीला हादरे बसत असल्याची जाणीव झाली. त्यामुळे नेमकं काय घडतंय, हे पाहण्यासाठी ते खाणीपासून सुरक्षित अंतरावर उभे राहिले. खाण बुजली हे कामगार नेमकं काय घडतंय हे पाहत होते. तोच खाणीच्या वर असलेल्या कड्याचा भाग हलायला सुरुवात झाली. त्यातील काहीजणांनी या घटनेची त्यांच्या मोबाईलमध्ये दृष्यं टिपली. या दृष्यांमध्ये लाखो टन माती खाणीमध्ये कोसळत असल्याचं दिसतं. काही वेळ अगोदर आपण खाणीत उतरलो असतो, तर काय झालं असतं, या कल्पनेनंही कामगारांच्या काळजाचा थरकाप उडाला. बघता बघता ही खाण बुजली आणि कामगारांची सर्व यंत्रं आणि उपकरणं त्याखाली गाडली गेली. मात्र आपला जीव वाचल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं.

  हे वाचा - भयंकर VIDEO! अमरनाथच्या गुंफेजवळ ढगफुटी!

  कामगारांच्या जीवाची काळजी कोण घेणार? राजस्थानमध्ये अशा अनेक खाणींना सरकारनं परवानगी दिली असून अधिकाधिक आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी तिथं सतत खोदकाम सुरु असतं. मात्र काही ठिकाणी अशास्त्रीय पद्धतीनं खड्डा झाल्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याबाबत शासनानं निकष ठरवून देऊन कामगारांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही, अशा उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं खाण कामगारांचं म्हणणं आहे.
  Published by:desk news
  First published:

  Tags: Rajasthan, Social media viral

  पुढील बातम्या