शिमला, 30 जुलै: महाराष्ट्राला जबरदस्त तडाखा दिल्यानंतर पावसानं उत्तर भारतात मार्गक्रमण केलं आहे. महाराष्ट्रात एकाच दिवशी दरड कोसळून आणि अतिवृष्टीमुळे 200 हून जणांचा दुर्दैवी मृत्यू (Deaths) झाला आहे. ही घटना ताजी असताना, महामार्गावर दरड कोसळल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. सुदैवाची बाब म्हणजे यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरड कोसळणार असल्याचं लक्षात येताच, येथील नागरिकांनी जीव मुठीत घेऊन घटनास्थळावरून पळ काढला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल (Landslide Viral video) होतं आहे.
हिमाचल प्रदेशातील नॅशनल हाइवे 707 पांवटा-शिलाई महामार्गावर (paonta shillai highway) भूस्खलन (Landslide) झाल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक बंद (Traffic jam) करण्यात आली आहे. या घटनेचा लाइव्ह व्हिडीओ समोर आला आहे. बडवासनजीक महामार्गावर भूस्खलन झाल्यानंतर लोकांनी जीव मुठीत घेऊन पळ काढला आहे. दरड कोसळल्यानं महामार्गावर मागील काही तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांची मोठी रांग याठिकाणी लागली आहे. शेकडो लोकं याठिकाणी अडकून पडले आहेत.
महामार्गावर भूस्खलन, घटनेचा LIVE VIDEO pic.twitter.com/4CEBOhG0rX
— News18Lokmat (@News18lokmat) July 30, 2021
हेही वाचा-VIDEO: कोल्हापुरातील महापुरात ट्रॅकखालील जमीन गेली वाहून
खरंतर पांवटा शिलाई महामार्गाला दुतर्फा करण्याचं काम वेगात सुरू आहे. पण या महामार्ग बांधणीच्या कामाच्या ठिकाणी देखील दरड कोसळण्याची भीती व्यक्ती केली जात आहे. त्यामुळे अनेक अडचणी वाढताना दिसत आहे. या महामार्गावर भूस्खलन झाल्यानंतर, विजवाहक खांब देखील उन्मळून पडले आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये बत्ती गुल झाली आहे. शिवाय घटनास्थळी उपस्थित असलेली लोकं विजेचा धक्का बसण्यापासून थोडक्यात बचावली आहेत.
हेही वाचा-VIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड
या घटनेची माहिती स्थानिक आपत्ती विभागाला देण्यात आली आहे. पण महामार्ग सुरळीत करण्यात अनेक अडचणी येत आहेत. या महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तर शेकडो वाहनं मागील काही तासांपासून अडकून पडली आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होताना दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Himachal pradesh, Viral video.