मराठी बातम्या /बातम्या /देश /नितीशकुमारांनी बिहारचा विश्वासघात केला -लालू ; शरद यादवही नाराज ?

नितीशकुमारांनी बिहारचा विश्वासघात केला -लालू ; शरद यादवही नाराज ?

''मी ठरवलं असतं तर नितीशकुमारांना मुख्यमंत्रीही होऊ दिलं नसतं. पण तसं केलं नाही, बिहारी जनतेला दिलेला शब्द मी पाळला आणि जदयूच्या जागा कमी असूनही नितीशकुमारांना मुख्यमंत्री केलं पण त्याच नितीशकुमारांनी दीड वर्षात महागठबंधन तोडून भाजपशी घरोबा केला, हा बिहारी जनादेशाचा विश्वासघात आहे,'' असा घणाघात लालू प्रसाद यादव यांनी केलाय.

पुढे वाचा ...

  पाटणा, 27 जुलै: नितीश कुमारांनी एनडीएसोबत जाऊन बिहारी जनतेचा विश्वासघात केल्याची टीका लालू प्रसाद यादव यांनी केलीय. नितीशकुमार यांनी आज पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी पत्रकार घेऊन नितीशकुमार यांच्यावर हल्ला चढवला. महागठबंधन आघाडीत आरजेडीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या त्यामुळे मी ठरवलं असतं तर नितीशकुमारांना मुख्यमंत्रीही होऊ दिलं नसतं. पण तसं केलं नाही, बिहारी जनतेला दिलेला शब्द मी पाळला आणि जदयूच्या जागा कमी असूनही नितीशकुमारांना मुख्यमंत्री केलं पण त्याच नितीशकुमारांनी दीड वर्षात महागठबंधन तोडून भाजपशी घरोबा केला, हा बिहारी जनादेशाचा विश्वासघात आहे, असा घणाघात लालू प्रसाद यादव यांनी केलाय.

  शरद यादवही नितीशकुमारांवर नाराज

  जेडीयूचे ज्येष्ठ नेते शरद यादवही नितीशकुमारांवर नाराज आहेत. नितीशकुमार यांनी पुन्हा भाजपसोबत जाणं शरद यादव यांना अजिबात आवडलेलं नाही. कदाचित म्हणूनच बिहारमधल्या या राजकीय नाट्यावर त्यांनी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही

  नितीशकुमारांनी आम्हाला फसवलं -राहूल गांधी

  नितीशकुमार यांच्या या राजकीय खेळीवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनीही टीका केलीय. नितीशकुमारांनी स्वार्थी राजकारण करून आमची फसवणूक केल्याचं राहूल गांधींनी म्हटलंय. बिहारच्या जनतेनं महागठबंधनला सत्तेचा कौल देत भाजपला साफ नाकारलं होतं. तरीही नितीशकुमारांनी महागठबंधन तोडून भाजपशी पुन्हा अभद्र युती केल्याने ही बिहारी जनतेची घोर फसवणूक आहे, अशा शब्दात राहुल गांधींनी नितीशकुमारांवर हल्ला चढवलाय.

  एनडीए मजबूत तर युपीए सैरभैर

  नितीशकुमारांच्या या रागबिहारी राजकीय खेळीमुळे केंद्रातही विरोधक आणखी कमकुवत बनलेत. उत्तरभारतात दिल्ली वगळता बिहार हेच एकमेव महत्वाचं राज्य विरोधकांच्या हाती होतं. पण तेही हातून निसटल्याने एनडिए आघाडी आणखी मजबूत झालीय तर युपीए पूर्णतः कोलमडून गेल्याचं चित्र आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही नितीशकुमारांच्या या खेळीच्या एनडीएला फायदा तर युपीएला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

  First published:
  top videos