'चल डबलसीट रं...' तेज प्रताप आणि ऐश्वर्या सायकलवर डबलसीट !

'चल डबलसीट रं...' तेज प्रताप आणि ऐश्वर्या सायकलवर डबलसीट !

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादवने पत्नी ऐश्वर्या रायसोबतचा एक रोमँटिक फोटो त्याच्या इन्स्टाग्रावर पोस्ट केला आहे.

  • Share this:

18 मे : राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादवने पत्नी ऐश्वर्या रायसोबतचा एक रोमँटिक फोटो त्याच्या इन्स्टाग्रावर पोस्ट केला आहे. तेज प्रतापने नवविवाहित वधूला सायकलवर डबलसीट बसवल्याचा हा फोटो आहे.

तेज प्रताप आणि ऐश्वर्या परस्परांकडे पाहून नजरेमधून प्रेम व्यक्त करत असल्याचा हा रोमँटिक फोटो आहे. १५ मे रोजी पाटण्याच्या मैदानावर तेज प्रताप आणि ऐश्वर्याचा शाही विवाह पार पडला. अनेक हायप्रोफाईल पाहुणे मंडळी वधू-वरांना आशिर्वाद देण्यासाठी आले होते.

चारा घोटाळयात तुरुंगवासाची शिक्षा झालेले लालू प्रसाद यादवही खास या लग्नासाठी पॅरोल बाहेर आले होते. ऐश्वर्या बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांची नात आहे. तिचे वडिल चंद्रिका राय आमदार आहेत.

 

First published: May 18, 2018, 8:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading