मराठी बातम्या /बातम्या /देश /लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी, 80 टक्क्यांहून किडनी निकामी

लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी, 80 टक्क्यांहून किडनी निकामी

संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र

Lalu Prasad Yadav health updates: लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे.

पटाणा, 09 मार्च: चारा घोटाळ्यात दोषी ठरल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) (Rashtriya Janata Dal) सुप्रीमो लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांची किडनी 80 टक्क्यांहून अधिक निकामी झाली आहे. त्यांच्या प्रकृतीत अजिबात सुधारणा नसून पूर्वीपेक्षा वाईट झाली आहे.

ताज्या रिपोर्टनंतर औषधाचा डोस किंवा औषध बदलण्याचा विचार केला जात आहे. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळली आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास त्यांना डायलिसिस करावं लागू शकतं. लालू सध्या प्रकृतीच्या कारणास्तव रिम्स रुग्णालयाच्या पेइंग वॉर्डमध्ये दाखल आहेत.

पंतप्रधान मोदींचे दोन फोन कॉल, अन् 12 बसमधून 694 भारतीय विद्यार्थ्यांची सुटका

मंगळवारी, रिम्समध्ये लालू प्रसाद यादव यांच्या सीरम क्रेटेनाइन लेवलची तपासणी करण्यात आली. जी पूर्वी 3.5 वरून 4.1 पर्यंत वाढली होती. डॉक्टरांच्या मते, अशा परिस्थितीत लालू प्रसाद यादव यांचे डायलिसिस करून रक्त स्वच्छ करण्याची गरज भासू शकते.

मूत्रपिंड आणि इतर रोगांचे सतत मॉनिटरिंग

लालूंवर उपचार करणाऱ्या डॉ.विद्यापती यांनी सांगितलं की, त्यांचा रक्तदाब सामान्य आहे.ब्‍लड शुगरची स्थितीही ठीक आहे. त्यांच्या किडनीसह इतर आजारांवरही सातत्यानं देखरेख केली जात आहे.

प्रकृती अस्वस्थ्यामुळे जामीन अर्ज दाखल

लालू हे किडनीसह अनेक आजारांचे रुग्ण आहेत. त्यांच्या दातांचं नुकतंच रूट कॅनल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब आहे. चारा घोटाळ्यातील सर्वात मोठे प्रकरण असलेल्या दोरांडा ट्रेझरी प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झाल्यानंतर त्यांनी प्रकृती अस्वस्थ्याच्या कारणावरून जामीन अर्ज दाखल केला आहे. त्याची सुनावणी 11 मार्च रोजी होणार आहे.

First published:

Tags: Bihar