मराठी बातम्या /बातम्या /देश /लालू जेलमध्ये करणार माळीकाम; दिवसाला मिळणार 93 रूपये वेतन

लालू जेलमध्ये करणार माळीकाम; दिवसाला मिळणार 93 रूपये वेतन

तसे आदेशच रांचीच्या स्पेशल सीबीआय कोर्टमध्ये देण्यात आले आहेत. तसंच त्यांना 93 रूपये  वेतन प्रतिदिन मिळणार आहे.

    07 जानेवारी: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि चारा घोटाळ्यातील  आरोपी लालू प्रसाद यादव  आता जेलमध्ये माळीकाम करणार आहेत.  तसे आदेशच रांचीच्या स्पेशल सीबीआय कोर्टमध्ये देण्यात आले आहेत. तसंच त्यांना 93 रूपये  वेतन प्रतिदिन मिळणार आहे.

    काल रांचीच्या स्पेशल सीबीआय कोर्टाने चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावली आहे. त्यानुसार साडेतीनवर्ष तुरूंगवास आणि 5 लाख रूपये दंड सुनावण्यात आला आहे. तसंच जेलमध्ये त्यांना माळीकाम करण्याचे आदेश देण्यात  आले आहेत. त्यामुळे एकेकाळी  केंद्रात रेल्वेमंत्रालय  सांभाळणारे लालू प्रसाद यादव आता जेलमध्ये  दिवसा 93 रूपये रोजवर काम करणार आहेत.   रांची कोर्टाच्या निर्णयाविरूद्ध आता लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव आता हाय कोर्टात दाद मागणार आहे. याशिवाय अजूनही खटल्यांमध्ये लालू प्रसाद यादव दोषी असून त्या खटल्यांचा लवकरच निर्णय लागणार आहे. लालू प्रसाद यादवांशिवाय बाकीच्या सहा आरोपींना सात वर्षांची शिक्षा झाली आहे.

    First published:
    top videos

      Tags: Bihar, India, Lalu prasad yadav