अडवाणींना अटक करणारे अधिकारी आता भाजप सरकारमध्ये आहेत मंत्री

अडवाणींना अटक करणारे अधिकारी आता भाजप सरकारमध्ये आहेत मंत्री

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना रथयात्रेच्या वेळी लालूप्रसाद यादव यांच्या आदेशावरून अटक करण्यात आली होती. ज्या अधिकाऱ्याने अडवाणी यांना अटक केली ते आता भाजप सरकारमध्ये मंत्री आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 मे : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना त्यांनी काढलेल्या रथयात्रेच्या वेळी लालूप्रसाद यादव यांच्या आदेशावरून अटक करण्यात आली होती. ज्या अधिकाऱ्याने अडवाणी यांना अटक केली ते आता भाजप सरकारमध्ये मंत्री आहेत.

भाजपच्या राजकीय यशाचं श्रेय अनेक वेळा अटलबिहारी वाजपेयी यांच्यापेक्षाही लालकृष्ण अडवाणींना दिलं जातं. भाजपचे कार्यकर्ते अडवाणींच्या रथयात्रेची आठवण अभिमानाने काढतात. पण त्याचवेळी लालू प्रसाद यादव यांनी अडवाणींना अटक केली होती याचीही आठवण काढली जाते.

गोपालगंज टू रायसीना

लालूप्रसाद यादव यांचं 'गोपालगंज टू रायसीना - माय पॉलिटिकल जर्नी' हे आत्मचरित्र सध्या गाजतं आहे. यामध्ये लालूंनी ही गोष्ट सांगितली आहे. जो कोणी अडवाणींवरच्या कारवाईला अटकाव करेल त्याला गोळी मारा, असे आदेश लालूप्रसाद यादव यांनी दिले होते.

लालकृष्ण अडवाणींना 23 ऑक्टोबर 1990 ला अटक करण्यात आली. लालूंनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे, माझी रथयात्रा रोखण्याचं काम जर कुणी केलं तर मी त्याला बघून घेईन, असं अडवाणी म्हणाले होते. अडवणींनी विरोधकांना मोठं आव्हान दिलं होतं.


लालकृष्ण अडवाणी आणि त्यांना अटक करणारे अधिकारी आर. के. सिंह

लालकृष्ण अडवाणी आणि त्यांना अटक करणारे अधिकारी आर. के. सिंह


रथयात्रेत अटक

अडवाणींची रथयात्रा जेव्हा बिहारमध्ये आली तेव्हा त्यांना समस्तीपूरमध्ये अटक करण्यात आली. आर. के. सिंह नावाच्या एका अधिकाऱ्याने त्यांना अटक केली होती. आता आर. के. सिंह हे भाजपच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांनी भारताच्या गृहखात्याचे सचिव म्हणूनही काम पाहिलं आहे. सप्टेंबर 2017 मध्ये त्यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. त्यांच्याकडे ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार सोपवण्यात आला.

अमानुल्लाह यांचा नकार

लालू प्रसाद यादव यांनी धनबादचे उपायुक्त अफजल अमानुल्लाह यांना अडवाणींना अटक करण्याचे आदेश दिले पण अमानुल्लाह यांनी हे करायला नकार दिला. अडवाणींना अटक केली तर देशात तणाव वाढेल, असं त्यांना वाटत होतं. पण आर. के. सिंह यांनी मात्र अडवाणींना अटक केली.

अडवाणी यांच्या अटकेमुळेच भाजपने व्ही. पी. सिंग यांच्या सरकारचा पाठिंबा काढला आणि ते सरकार पडलं व्ही. पी. सिंग यांच्या मंडल अस्त्राला शह देण्यासाठी भाजपने मंदिराचं ब्रह्मास्त्र काढलं. या सगळ्या घटनांमुळे देशाचं राजकारण पूर्णपणे बदलून गेलं. व्ही. पी. सिंग यांच्या पतनानंतर काँग्रेसच्या मदतीने चंद्रशेखर पंतप्रधान बनले.

रथयात्रा रोखण्याचे प्रयत्न

राम मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण तापवण्यासाठी अडवणींनी 25 सप्टेंबर 1990 मध्ये रथयात्रा सुरू केली. रथयात्रेचा पहिला टप्पा 14 ऑक्टोबरला पूर्ण झाला. अडवाणी दिल्लीला आले तेव्हा पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी ज्योति बसु यांना दिल्लीला बोलवलं. ज्योति बसु यांनी अडवाणींशी चर्चा केली आणि त्यांना रथयात्रा थांबवण्याचा सल्ला दिला. पण अडवाणी यांनी हा सल्ला फेटाळून लावला होता.

लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेला विरोध करण्याच्या निमित्ताने लालू प्रसाद यादव यांनी बिहारमध्ये अल्पसंख्यांकांची मतं आपल्या बाजूने वळवली. त्याचसोबत ते आपली यादव व्होट बँकही अजून मजबूत करत होते.

====================================================================

वायुसेनेचं विमान घसरलं, विमानतळावरून EXCLUSIVE रिपोर्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 03:54 PM IST

ताज्या बातम्या