भाजपमध्ये अडगळीत पडलेले अडवाणी, जोशी ट्रेंडिंगमध्ये!

भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 24, 2019 04:02 PM IST

भाजपमध्ये अडगळीत पडलेले अडवाणी, जोशी ट्रेंडिंगमध्ये!

मुंबई, 24 मे : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भाजपनं मोठं यश मिळवलं. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या चाणक्यनीतीची देखील चर्चा रंगली. 2014मध्ये सत्तेत आल्यानंतर अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी पक्षातील ज्येष्ठांना डावललं अशी चर्चा होती. त्यामध्ये मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी यांची नावं होती. तर,यावेळी लालकृष्ण अडवाणी यांना पक्षानं गांधीनगरमधून लोकसभेची उमेदवारी देखील नाकारली. त्यामुळे चर्चेत आणखीन भर पडली. पण, लोकसभा निकालानंतर नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली. त्यामुळे आता सोशल मीडियावर या भेटीबद्दल जोरात चर्चा आहे. ट्विटरवर देखील दोन्ही नावं सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत.Loading...
...म्हणून 6 आमदारांना 15 दिवसांत द्यावा लागणार राजीनामा


मुरली मनोहर जोशींना नाकारली उमेदवारी

2014च्या लोकसभा निवडणुकीकरता मुरली मनोहर जोशी यांना वाराणसी सोडून कानपूरमधून निवडणूक लढवावी लागली होती. तर, यंदा पक्षानं वयाचं कारण देत त्यांची कानपूरमधील उमेदवारी देखील नाकारली होती. त्यावरून नरेंद्र मोदी, अमित शहा यांना लक्ष्य करण्यात आलं होतं.


कोकणात नारायण राणेंच्या पराभवामागे ही आहेत कारणं

गांधीनगरमधून अमित शहा

गांधीनगर हा लालकृष्ण अडवाणी यांचा मतदारसंघ. पण, यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या ठिकाणावरून निवडणूक लढवली. त्यावरून देखील अडवाणी नाराज असल्याची चर्चा रंगली होती. पण, विजयानंतर आता अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी दोन्ही नेत्यांची भेट घेतली आहे.


VIDEO: विजयाच्या आनंदात फारूख अब्दुल्लांनी धरला ढोल-ताशावर ठेका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 02:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...