S M L

प्रणवदांच्या भाषणाचं लालकृष्ण अडवाणींकडून कौतुक

प्रणव मुखर्जी यांना सरसंघचालक मोहन भागवत यांनी निमंत्रित केलं आणि हे निमंत्रण प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारले या दोन्ही गोष्टी कौतुकास्पद आहेत

Sachin Salve | Updated On: Jun 8, 2018 07:23 PM IST

प्रणवदांच्या भाषणाचं लालकृष्ण अडवाणींकडून कौतुक

नवी दिल्ली, 08 जून : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष समारोप वर्गाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हजेरी लावली होती. त्यांच्या भाषणाने देशात सहिष्णुतेचे वातावरण वाढीला लागण्यास मदत होईल असं वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केलंय.

प्रणव मुखर्जी यांना सरसंघचालक मोहन भागवत यांनी निमंत्रित केलं आणि हे निमंत्रण प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारले या दोन्ही गोष्टी कौतुकास्पद आहेत. मोहन भागवत यांनी वेगळ्या विचारांच्या ज्ञानी माणसाला संघाच्या मंचावर आणले. या दोघांनी संघाच्या मंचावर केलेली भाषणं देशाला दिशा देणारी ठरली आहेत. अशा शब्दात लालकृष्ण अडवाणी यांनी कौतूक केलं.

प्रणव मुखर्जी आणि आणि मोहन भागवत या दोघांनी मतभेद बाजूला ठेवून देशाच्या संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले. आपल्या देशात विविधेतून कशी एकता आहे आणि त्यातूनच राष्ट्रवाद कसा वाढवला पाहिजे हे सांगणारी दोघांचीही भाषणे होती. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार आणि विचार देशापर्यंत पोहचवला.

प्रणव मुखर्जी यांनी देशाची संस्कृती, इतिहास, स्वातंत्र्यलढा यांचा उल्लेख आपल्या भाषणात करत देशात सहिष्णुता कशी टिकली पाहिजे याचे उदाहरण देशासमोर ठेवले. संघाच्या मंचावर प्रणव मुखर्जी यांनी आपल्या वेगळ्या विचारसरणीतून देशापुढे आदर्श विचार ठेवले असंही अडवाणी यांनी म्हटलं आहे.

अडवाणींची स्तुतीसुमनं

Loading...
Loading...

-लालकृष्ण अडवाणींकडून मोहन भागवत, प्रवण मुखर्जींचं कौतूक

-भागवतांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला मुखर्जींना बोलावणं कौतुकास्पद

-भागवतांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला मुखर्जींना बोलावणं कौतुकास्पद

-दोघांनी संघाच्या मंचावरून केलेली भाषणं देशाला दिशा देणारी ठरली

-त्यांच्या भाषणाने देशात सहिष्णुतेचं वातावरण वाढीस लागण्यास मदत होईल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 8, 2018 07:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close