ट्रेन लेट झाली तर आता सरकार देणार भरपाई

ट्रेन लेट झाली तर आता सरकार देणार भरपाई

लखनौ- दिल्ली 'तेजस' एक्सप्रेस बद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी एक ट्वीट केलं आहे. ही तेजस एक्सप्रेस निघायला उशीर झाला तर रेल्वे मंत्रालय त्याची नुकसान भरपाई देईल, असं पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर : आम्ही रेल्वेच्या वेळापत्रकातली अनियमतता दूर करू, असं मोदी सरकारने आधी जाहीर केलं होतं. पण तरीही ट्रेन वेळेवर येण्याचं उद्दिष्ट साध्य झालेलं नाही. त्यामुळे सरकारने आता एक वेगळीच घोषणा केली आहे.

लखनौ- दिल्ली 'तेजस' एक्सप्रेस बद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी एक ट्वीट केलं आहे. ही तेजस एक्सप्रेस निघायला उशीर झाला तर रेल्वे मंत्रालय त्याची नुकसान भरपाई देईल, असं पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.

ट्रेन निघायला 1 तास उशीर झाला तर 100 रुपयांची नुकसान भरपाई दिली जाईल. ट्रेन जर 2 तास उशिरा निघाली तर 250 रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

ट्रेन जर कॅन्सल झाली तर त्याची नुकसान भरपाई दिली जाते. त्यातही काही नियम आहेत. आता पियुष गोयल यांच्या ट्विटनुसार ट्रेन उशिरा निघाल्याची नुकसान भरपाई मिळते का ते पाहावं लागेल.

तेजस एक्सप्रेस ही अत्याधुनिक सुविधा असलेली ट्रेन आहे. कोकण रेल्वेमध्येही मुंबई - गोवा तेजस एक्सप्रेस धावते. पण पैसे परत देण्याची ही सुविधा फक्त दिल्ली लखनौ तेजस एक्सप्रेससाठी देण्यात आली आहे.

==========================================================================

VIDEO : सभेत घुसला कुत्रा अन् पवार म्हणाले, 'शिवसेनेची लोकं आली का?'

Published by: Arti Kulkarni
First published: October 1, 2019, 6:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading