लग्नाच्या वरातीत घुसला ट्रक, 8 जणांचा जागीच मृत्यू

लग्नाच्या वरातीत घुसला ट्रक, 8 जणांचा जागीच मृत्यू

लग्नाच्या वरातीमध्ये भरधाव वेगात ट्रक शिरल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 8 वऱ्हाड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • Share this:

बिहार, 11 जुलै : रस्त्यावर वाहनांची धडक झाल्यामुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाच्या वरातीमध्ये भरधाव वेगात ट्रक शिरल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 8 वऱ्हाड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच आक्रोश पाहायला मिळतो.

बिहारच्या हलसी बाजारमध्ये ही घटना घडली आहे. लग्नाच्या वरातीत शिरलेल्या ट्रकने कुटुंबाती 8 लोकांना चिरडलं तर यामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. लग्न सोहळा असल्यामुळे संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण होतं. पण अशात एका मिनिटात होत्याचं नव्हतं झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

या भीषण अपघातामध्ये 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर जखमींवर नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रक बाजूला करून 8 मृतदेह ताब्यात घेतले आहेत तर संपूर्ण प्रकाराची कसून चौकशी सुरू आहे.

अपघातात कुटुंबातील 8 जणांनी जीव गमावल्यामुळे संपूर्ण गावातून यावर राग व्यक्त करण्यात येत आहे. मृतांच्या घरचे आक्रमक झाल्यामुळे परिसरात त्यांना आवरण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर मृतांच्या नातेवाईकांनी घटनेच्या विरोध करत परिसरात मोठा आक्रोश केला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा :वहिनीच्या प्रेमात पडलेल्या दिराने सख्या भावाचाच काढला काटा!

मृतांमध्ये मंजीत कुमार, नकट मांझी, मुस्कान कुमारी, उमेश मांझी, राजीव मांझी, धनराज मांझी, शंभू मांझी आणि गोरे मांझी यांचा समावेश आहे. लग्न म्हटलं की सगळ्यात आनंदाचा क्षण त्यात अशी घटना घडल्यामुळे कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. घरात सध्या एकच शांतता आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर लग्न सोहळ्यामुळे हसू होतं त्यात आता सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावालाच मोठा धक्का बसला आहे.

VIDEO: बियाणं विकणाऱ्या कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक, यासोबत टॉप 18 बातम्या

First published: July 11, 2019, 9:14 AM IST

ताज्या बातम्या