मराठी बातम्या /बातम्या /देश /

Lakhimpur Kheri Case : सचिन पायलट यांनाही अडवलं; पोलिसांनी घेतलं ताब्यात

Lakhimpur Kheri Case : सचिन पायलट यांनाही अडवलं; पोलिसांनी घेतलं ताब्यात

योगी सरकारच्या पोलिसांनी पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना दोघांना ताब्यात घेण्यात आहे.

योगी सरकारच्या पोलिसांनी पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना दोघांना ताब्यात घेण्यात आहे.

योगी सरकारच्या पोलिसांनी पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना दोघांना ताब्यात घेण्यात आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर : Lakhimpur Kheri Case: सचिन पायलट आणि आचार्य प्रमोद यांना ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. लखीमपूर (Lakhimpur Violence) येथे जात असताना योगी सरकारच्या पोलिसांनी कारवाई करीत दोघांना ताब्यात घेतलं. लखीमपूर कांडात पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी जाणारे राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याशिवाय आचार्य प्रमोद कृष्णन यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. (Lakhimpur Kheri Case Sachin Pilot took into custody by uttar pradesh police)

लखीमपुर जात असताना मुरादाबादमधील पोलिसांनी कारवाई केली आहे. सचिन पायलट यांना पोलिसांनी अज्ञात ठिकाणी नेलं आहे. यापूर्वी योगी सरकारच्या पोलिसांनी सचिन पायलट यांनी लखीमपूर जाण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र पायलट यांनाही अडवण्यात आलं. त्यामुळे पायलट यांच्यासोबत गेलेल्या कार्यकर्त्यांनीही गोंधळ घातला. दुसरीकडे राहूल गांधी हे प्रियंका गांधी यांच्यासह सीतापूरसाठी लखीमपूर येथून रवाना झाल्या आहेत.

हे ही वाचा-राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊतांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, म्हणाले...

काय आहे प्रकरण?

लखीमपूर खेरी प्रकरणानंतर देशभरातील वातावरण (Lakhimpur Violence) चिघळलं आहे. याठिकाणी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण तापले आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते सातत्याने लखीमपूर खेरी गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांनी आज छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्यासोबत लखीमपूरला जाण्याची घोषणा केली आहे, परंतु उत्तर प्रदेश प्रशासनाने त्यांना परवानगी दिलेली नाही. शेतकऱ्यांवर पद्धतशीर हल्ला होत असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi PC on 06th October)  यांनी लखीमपूर खेरी येथील हिंसाचारावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना गांधी म्हणाले की, रविवारी मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी ते दोन मुख्यमंत्र्यांसह लखीमपूर खेरीला भेट देण्याचा प्रयत्न करतील. याबाबत राहुल गांधी म्हणाले की आम्ही तिघेजण जात आहोत. कलम 144 5 लोकांना लागू होतो.

First published: