मराठी बातम्या /बातम्या /देश /मिस्ड कॉलमुळे झाली मैत्री, जीवन-मरणाची शपथही घेतली; पण पुढे घडलं धक्कादायक कांड

मिस्ड कॉलमुळे झाली मैत्री, जीवन-मरणाची शपथही घेतली; पण पुढे घडलं धक्कादायक कांड

बिहारमधील कटिहार (katihar) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीने आपल्या कथित प्रियकरावर फसवणूक (fraud) केल्याचा आरोप करत चौकात एकच गोंधळ घातला.

बिहारमधील कटिहार (katihar) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीने आपल्या कथित प्रियकरावर फसवणूक (fraud) केल्याचा आरोप करत चौकात एकच गोंधळ घातला.

बिहारमधील कटिहार (katihar) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीने आपल्या कथित प्रियकरावर फसवणूक (fraud) केल्याचा आरोप करत चौकात एकच गोंधळ घातला.

कटिहार, 20 एप्रिल : बिहारमधील कटिहार (Katihar Crime News) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीने आपल्या कथित प्रियकरावर फसवणूक (Relationship Issue) केल्याचा आरोप करत चौकात एकच गोंधळ घातला. तर तरुणाने या तरुणीचे आरोप फेटाळून लावले आहे. युवतीच्या प्रियकराच्या भावाने याप्रकरणी पोलिसांत जाणार असल्याचे सांगितले. तर यासोबतच तरुणीनेही पोलीस तक्रार करणार असल्याचे सांगितले. तर संपूर्ण प्रकरणाबाबत स्थानिक पोलिसांना माहिती नाही. याप्रकरणी कोणीही अजून तक्रार दिली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

काय आहे धक्कादायक प्रकार?

तरुणी आणि तिचा कथित प्रियकर दशरथ यांच्यात आधी मिस कॉलमुळे मैत्री झाली होती. यानंतर हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. युवती सुचित्राचे म्हणणे आहे की, त्यांचे प्रेम संबंध खूप पुढे निघून गेले होते. सुचित्राने असा आरोप केला आहे की 2 वर्षातच त्यांच्यात वाद सुरू झाले. दशरथला हे संबंध नको होते. तर त्या युवती यासाठी तयार नव्हती. जेव्हा तिने प्रियकरावर दबाव टाकला तर त्याने तिला त्याचा भाऊ पोलिसात असल्याचे सांगितले. तसेच त्याचे कोणी काहीच करू शकत नाही, असे सांगितले.

हे वाचा - Instagram वर मैत्री अल्पवयीन मुलीला पडली महागात; धमकी देत 10 जणांनी केलं धक्कादायक कृत्य

हा तरुण टोला येथील रहिवासी आहे. या तरुणीने सांगितले की, ती पोलिसांत देखील गेली होती. मात्र, तिला कोणतीच मदत मिळाली नाही. यानंतर तिने तिच्या प्रियकराच्या घराजवळच्या चौकात ठिय्या मांडत गोंधळ केला. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या प्रियकरासोबत संपर्क झाला नाही. मात्र, त्याच्या भावाने युवतीच्या दाव्यांना नाकारले आहे. तसेच याप्रकरणी ते पोलिसांत तक्रार देणार आहे. दरम्यान, पोलीस अधिकारी संजय कुमार यांनी सांगितले आहे की, याप्रकरणी अजून कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही.

First published:

Tags: Bihar, Love story