मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यामागे महिलांचा हात; काय सांगते आकडेवारी?

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यामागे महिलांचा हात; काय सांगते आकडेवारी?

नरेंद्र मोदींना महिलांनी जास्त मतदान केलं. महिलांसाठी राबवलेल्या योजना यावेळी महत्त्वपूर्ण ठरल्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मे : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप, NDAनं पुन्हा सत्ता स्थापन केली. 2014शी तुलना करता 2019मध्ये भाजपचं संख्याबळ हे 282वरून 303 झालं आहे. निवडणुकीत महिला मतदरांची टक्केवारी ही पुरूषांपेक्षा देखील जास्त आहे. कारण, लोकसभेच्या सात टप्प्यांमध्ये 57.46 टक्के मतदान झालं. त्यापैकी 55.26 टक्के मतदान हे पुरूषांनी केलं. तर, 59.92 टक्के मतदान महिलांनी केलं. म्हणजेच पुरूषांपेक्षा 4.66 टक्के मतदान हे महिलांनी जास्त केलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधानपद होण्यामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची आहे.

विधवा पेन्शन, गॅस कनेक्शन, स्वच्छता अभियान, नोकरी यासारखे मुद्दे महिलांनी मतदान करताना विचारात घेतले. उत्तर प्रदेशात भाजपनं दुसऱ्यांदा जबरदस्त कामगिरी केली. यावेळी तिथल्या महिलांनी काय विचार करून मोदींना मत दिलं याची देखील माहिती घेण्यात आली.

SC, ST मतदारांना हवेत नरेंद्र मोदी; निवडणुकीत फिरवली बाजी

'दुसरा कोणताच नेता गावात आला नाही'

नरेंद्र मोदी यांनी चांगलं काम करण्याचं वचन दिलं आहे. त्यामुळे मी मोदींना मतदान केल्याचं एका महिलेनं सांगितलं. आत्तापर्यंत गावात इतर कुणीही नेता आला नाही. पण, मोदी दिलेलं वचन पाळतील असं या महिलेनं म्हटलं आहे.

'विकास हवा'

आम्हाला जातीचं राजकारण नको. तर, विकासाचं राजकारण हवं असं उत्तर कॉलेजमधील एका महिला सुपरवायझरनं दिलं. मोदींनी विकासाचं स्वप्न दाखवलं आहे. हे स्वप्न ते नक्की पूर्ण करतील असा विश्वास या महिलेनं व्यक्त केला.

पक्षापेक्षा कुटुंबाला अधिक महत्त्व; कमलनाथ, गहलोत यांच्यावर राहुल यांचे गंभीर आरोप!

'मोदी विकासासाठी पैसे पाठवतात'

नरेंद्र मोदी सरकारच्या काळात एका महिलेला सिलाई मशीन मिळाली. यापूर्वी तिला असं कोणतंच सहाय्य मिळालं नव्हतं. त्यामुऴे मी मोदींना मत दिल्याचं सदर महिला सांगते.

'गॅस कनेक्शन, टॉयलेटची व्यवस्था झाली'

नरेंद्र मोदी सरकारच्या काळात गॅस कनेक्शन आणि टॉयलेटची व्यवस्था झाल्याचं एका महिलेनं सांगितलं.

VIDEO: भरधाव कारचा थरार! चालकाचं नियंत्रण सुटल्यानं थेट घुसली चहाच्या टपरीत

First published: May 26, 2019, 12:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading