Home /News /national /

भारत-चीन सीमा वाद : लडाखच्या सीमेवरून चीननं आपलं सैन्य 2 किमी मागे हटवले

भारत-चीन सीमा वाद : लडाखच्या सीमेवरून चीननं आपलं सैन्य 2 किमी मागे हटवले

चीननं 2 किमी अंतरानं सैनिक मागे हटवल्याची माहिती मिळताच भारतानंही माघार घेतली आहे.

  लडाख, 04 जून : गेल्या काही दिवसांपासून LAC लडाखच्या सीमेवर भारत आणि चीन सैनिकांमध्ये तणावाचं वातावरण आहे. गॅलवान खोऱ्यात भारत आणि चीन दोन्ही सैन्यानं आपले सैनिक मागे हटवल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून चीननं या भागात आपलं सैन्य उभं केलं होतं. त्यामुळे भारतानंही लडाखच्या सीमेवर सैनिकांची गस्त वाढवली. मात्र चीननं 2 किमी अंतरानं सैनिक मागे हटवल्याची माहिती मिळताच भारतानंही माघार घेतली आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. चीन लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेसह (LAC) पॅंगॉंग त्सो आणि गॅल्व्हन व्हॅलीजवळ वेगानं आपल्या सैन्याचा विस्तार केला. त्यामुळं चिनी सैन्य भारताबरोबर असलेला सीमावाद आणखी वाढवण्याच्या तयारीत असल्याचं दिसत होते त्यामुळे भारतानेही गॅल्व्हन व्हॅलीत सैन्य वाढवलं. याच पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
  6 जूनला दोन्ही देशांमध्ये होणार महत्त्वपूर्ण बैठक लडाखच्या आपले सैनिक त्यांच्या समोर उभे केले आहेत. दोन्ही देशांकडून सध्या वाटाघाटी सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर 6 जूनला महत्त्वूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे. सीमावर्ती भागात चीनचं सैन्य आपलं सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहे भारतानंही
  Published by:Kranti Kanetkar
  First published:

  Tags: China

  पुढील बातम्या