लडाख सीमेवर तणाव, भारत-चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की

लडाख सीमेवर तणाव, भारत-चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की

भारत आणि चीनदरम्यान सीमारेषेवर पुन्हा तणाव वाढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (11 सप्टेंबर) दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : भारत आणि चीनदरम्यान सीमारेषेवर पुन्हा तणाव वाढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (11 सप्टेंबर) दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर हा प्रकार घडला आहे. या परिसरातील एक तृतीयांश भाग चीनच्या नियंत्रणाखाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये बराच वेळ धक्काबुक्की सुरू होती, परिणाम येथील तणाव वाढला आहे.

सैनिकांमध्ये का झाली धक्काबुक्की?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमारेषेवर भारतीय सैनिक गस्त घालत असताना ही घटना घडली. आपले सैनिक गस्तीवर असताना चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक समोर आल्यानं तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्या परिसरात भारतीय सैनिक गस्त घालत होते, त्यास चिनी सैनिकांनी विरोध दर्शवला. यानंतर दोन्ही सैनिकांदरम्यान धक्काबुक्की झाली. संध्याकाळी उशिरापर्यंत दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये संघर्ष सुरू होता.

(वाचा : VIDEO : 'गर्दन काट दूंगा तेरी', हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल)

यापूर्वी 2017मध्ये झाली झटापट

सैन्य दलातील सूत्रांच्या माहितीनुसार, लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (LAC)वरून मतभेद असल्यानं भारत-चीनदरम्यान अशा घटना होतच असतात. यापूर्वी 15 ऑगस्ट 2017मध्येही पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरच दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती.

(वाचा :पाकिस्तानात हाहाकार! दूध झालं पेट्रोलपेक्षा महाग, किंमत ऐकून व्हाल थक्क)

डोकलाम विवाद

2017मध्ये भारत आणि चीनदरम्यान डोकलामवरून मोठा संघर्ष निर्माण झाला होता. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये 73 दिवस वाद सुरू होता. वाटाघाटीनंतर हा वाद संपुष्टात आला. डोकलामध्ये चीननं एक रस्ता निर्माण केला होता, त्यावरून प्रचंड वाद झाला होता. यास भारतीय सैनिकांनी तीव्र विरोध दर्शवत मार्गाच्या निर्मितीचं कार्य थांबवलं होतं.

(वाचा :UNमध्ये पाकिस्तानने सत्य स्वीकारलं; काश्मीर भारतातील राज्य-पाक परराष्ट्र मंत्री)

VIDEO: आता शत्रूची काय बिशाद! भारतीय लष्कराचा ताफा आणखी मजबूत होणार

Published by: Akshay Shitole
First published: September 12, 2019, 11:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading