मराठी बातम्या /बातम्या /देश /

लडाख: 16 हजार फुटांवर डॉक्टरांनी केलं जवानाचं ऑपरेशन, धाडस पाहून कराव कराल सलाम!

लडाख: 16 हजार फुटांवर डॉक्टरांनी केलं जवानाचं ऑपरेशन, धाडस पाहून कराव कराल सलाम!

अतिशय उंचावर असलेल्या या भागात नैसर्गिक परिस्थितीही अतिशय प्रतिकूल असते. अतिथंड वातावरण, वारा, ऑक्सिजनची कमतरता अशा सगळ्या परिस्थितीत इथे जवान आपलं कर्तव्य बजावत असतात.

  • Published by:  Ajay Kautikwar

लेह 01 नोव्हेंबर: लष्करात जसं इंजिनिअर्सला महत्त्व असतं तेवढच महत्त्व असतं डॉक्टरांचं मात्र या डॉक्टर्सच्या कहाण्या फारश्या बाहेर येत नाही. लष्करातल्या डॉक्टर्सनी तब्बल 16 हजरा फुटांवर जात एका जवानाचे प्राण वाचवले आहेत. लेह मधल्या एका पोस्टवर तैनात असलेल्या या जवानाला अपेंडिक्स (Appendix)चा त्रास होत होता. त्याचं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ऑपरेशन करून त्यांनी इतिहास निर्माण केला आहे.

कामावर तैनात असलेल्या जवानाला अचानक अपेंडिक्स (Appendix)चा त्रास सुरू झाला. असह्य वेदना होत असतानाही प्रतिकूल परिस्थितीमुळे त्याला चॉपरच्या साह्याने हॉस्पिटमध्ये आणणं शक्य नव्हतं त्यामुळे शेवटी डॉक्टरांनीच उंचावर पोस्टजवळ जात ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.

एवढ्या उंचावर ऑपरेशन करणं धोक्याचं होतं. मात्र जवानाचे प्राण वाचवणंही आवश्यक होतं. त्यामुळे त्यांनी सगळा धोका पत्करत तिथे जात यशस्वी ऑपरेशन केलं आणि जवानाचे प्राण वाचवले. अतिशय कडाक्याची थंडी या भागात असते. ऑक्सिजनची कमरताही असते. त्यामुळे डॉक्टरांच्या या धाडसाला सलाम केला जात आहे.

अतिशय उंचावर असलेल्या या भागात नैसर्गिक परिस्थितीही अतिशय प्रतिकूल असते. अतिथंड वातावरण, वारा, ऑक्सिजनची कमतरता अशा सगळ्या परिस्थितीत इथे जवान आपलं कर्तव्य बजावत असतात. सध्याच्या चीन वादाच्या पार्श्वभूमीवर या भागाला महत्त्व प्राप्त झालं आहे.

First published: