Home /News /national /

मायभूमीत अवतरणार स्विझर्लंडसारखा नजारा, स्थानिकांनासाठी मोठी रोजगाराची संधी

मायभूमीत अवतरणार स्विझर्लंडसारखा नजारा, स्थानिकांनासाठी मोठी रोजगाराची संधी

लडाखमधील जोझिला बोगदा (Zojila Tunnel) जेड-मोडच्या मध्ये असणाऱ्या 18 किलोमीटरच्या पट्ट्यात हे टुरिस्ट स्टेशन बनवलं जाणार आहे.

    लडाख, 22 डिसेंबर : भारतात चीनसारखा काचेचा पूल बांधण्यात आला आहे तशाच प्रकारे आणखीन एक पर्यटन स्थळ तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. पर्यटन आणि रोजगार दोन्ही वाढीस लागण्यासाठी प्रशासन त्यावर नियोजन करत आहे. गेल्या वर्षी जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकार(Central Government) जम्मू काश्मीरवर(Jammu-Kashmir) लक्ष केंद्रित करत आहे. मागील वर्षी जम्मू काश्मीरचे विभाजन करून नवीन लडाख(Ladakh) व जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. त्यानंतर आता सरकारने लडाखवर विशेष लक्ष केंद्रित केलं असून लडाखमध्ये टुरिस्ट स्टेशन विकसित केलं जाणार आहे. यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरु झाल्या असून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांबरोबर(Lieutenant Governors) या संदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी(MORTH Nitin Gadkari) यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, लडाखमधील जोझिला बोगदा (Zojila Tunnel) जेड-मोडच्या मध्ये असणाऱ्या 18 किलोमीटरच्या पट्ट्यात हे टुरिस्ट स्टेशन बनवलं जाणार आहे. स्विझर्लंडमधील(Switzerland) दावोस(Davos) प्रमाणे हे टुरिस्ट स्टेशन तयार केलं जाणार असून, पर्यटकांना याचा मोठा लाभ होणार आहे. रोजगाराच्या संधी निर्माण होणार या टुरिस्ट स्टेशनचा स्थानिकांना मोठा फायदा होणार असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. यामुळे रोजगाराच्या(Employment Opportunities) मोठ्या संधी निर्माण होणार असून ही योजना जागतिक दर्जाची(World-Class Project) असणार आहे. दावोसप्रमाणे एक जागतिक दर्जाचं होमटाउन आम्ही या ठिकाणी तयार करणार असल्याचं देखील गडकरी यांनी म्हटलं. जोझिला दर्रा हा समुद्रासपाटीपासून (Sea Level) श्रीनगर-करगिल-लेह मार्गावर 11,578 मीटर उंचीवर आहे. 6 वर्षांत पूर्ण होणार हा प्रोजेक्ट नितीन गडकरी यांनी याविषयी माहिती देताना सांगितलं, पुढील सहा वर्षांमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या हिवाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यानं लेहचा देशाच्या इतर भागाशी संपर्क तुटतो. गडकरी यांनी जोझिला बोगद्याच्या निर्मितीला सुरुवात केलेली आहे. ऑकटोबर महिन्यात या बोगद्याच काम सुरु झालं असून यामुळं 12 महिने श्रीनगर आणि लेहमधील रस्ता सुरु राहणार आहे. सध्या यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरु झाल्या असून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांबरोबर(Lieutenant Governors) या संदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत. याचबरोबर जमीन ही इक्विटी कॅपिटल (Equity Capital) तत्त्वावर घेतली जाणार आहे. या टुरिस्ट स्टेशनचे डिझाईन खास स्विझर्लंडमधील आर्किटेक्टकडून तयार करून घेतलं जाणार आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Ladakh, Narendra modi

    पुढील बातम्या