बेरोजगारीचा चार वर्षातला रेकॉर्ड, नोटबंदीचा झाला परिणाम

बेरोजगारीचा चार वर्षातला रेकॉर्ड, नोटबंदीचा झाला परिणाम

लोकसभा निवडणुकीला चार महिने राहिलेले असतनाच लेबर ब्युरोची आलेली ताजी आकडेवारी सरकारची डोकेदुखी ठरणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 11 जानेवारी : लोकसभा निवडणुकीला चार महिने राहिलेले असतनाच लेबर ब्युरोची आलेली ताजी आकडेवारी सरकारची डोकेदुखी ठरणार आहे. या आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षातलं बेरोजगारीचं प्रमाण सध्या सर्वात जास्त असल्याचं स्पष्ट झालंय.

देशात निवडणुकीचे वारे आहेत. देशा झपाट्याने आर्थिक प्रगती करत असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करताहेत. जागतिक बँकेच्या नव्या आकडेवारीनुसार भारत जगात सर्वात वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. असं असताना बेरोजगारीची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.

नोटबंदीमुळे ऑटोमोबाईल, दुरसंचार, एअरलाईन्स, बांधकाम अशा क्षेत्रात अनेक कामगारांची कपात करण्यात आली आहे. नुकतच जग्वार लँड रोव्हर कंपनीत फक्त 4,500 हजारच कर्मचारी ठेवण्याचा कंपनीचा विचार असल्याची बातमी समोर आलीय. त्यामुळे शेकडो कर्मचाऱ्यांच्या पोटात गोळा आलाय. एतिहाद एअरलाईन्सने 50 पायलट्ना कामावरून काढून टाकलं.

लेबर ब्यूरोने सर्व्हे अजुन सार्वजनिक केलेला नाही. मात्र त्याची माहिती बाहेर आली आहे त्यानुसार 2013-2014 मध्ये बेरोजगारीचा दर 3.4 टक्के एवढा होता. तो 2016-2017 3.9 एवढा झाला आहे.

SPECIAL REPORT : 'पटक' देंगे म्हणणारे गले लगायेंगे?

First published: January 11, 2019, 9:12 PM IST

ताज्या बातम्या