Home /News /national /

भाजपचा प्रचार केला आणि मिठाई वाटल्याने जमावाकडून बेदम मारहाण, तरुणाचा तडफडून मृत्यू

भाजपचा प्रचार केला आणि मिठाई वाटल्याने जमावाकडून बेदम मारहाण, तरुणाचा तडफडून मृत्यू

बाबरला मारहाण झाल्याची घटना गेल्या 20 मार्चची आहे. त्याचा मृतदेह आज गावात पोहोचताच लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. लोकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला.

    लखनऊ, 27 मार्च : उत्तर प्रदेशातील कुशीनगरमधील रामकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या काठघरी गावात बाबर नावाच्या एका मुस्लिम तरुणाला भाजपचा प्रचार आणि सरकार स्थापन झाल्यावर मिठाई वाटल्याबद्दल जीव गमवावा लागला. या मुस्लिम तरुणाला त्याच्या शेजाऱ्यांनी बेदम मारहाण केली. पीडित तरुणाला तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यानंतर त्याला लखनऊला पाठवण्यात आलं तिथं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यूंनंतर अंत्यसंस्कार करण्यासही नकार ही घटना गेल्या 20 मार्चची आहे. त्याचा मृतदेह आज गावात पोहोचताच लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. लोकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. हे प्रकरण सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्यानं प्रशासकीय कर्मचारीही सक्रिय झाले. प्रादेशिक आमदारही घटनास्थळी पोहोचले. मृत बाबरच्या नातेवाइकांनी सांगितलं की, बाबर भाजपचा प्रचार करत आहे, यावरून शेजारी राहणारे लोक संतापले होते. आरोपींनी बाबरला भाजपचा प्रचार करण्यास वारंवार मनाई केली होती. बाबरनं 'जय श्री राम'चा नारा दिल्यामुळं इतर मुस्लीम संतप्त मृताचा भाऊ चंदे आलम यांनी सांगितलं की, 10 मार्चला भाजपचं सरकार स्थापन झाल्यानंतर बाबरनं गावात मिठाईही वाटली होती. त्यामुळं त्याचे शेजारी संतप्त झाले. 20 मार्चला दुकानातून परत आल्यानंतर बाबरनं 'जय श्री राम'चा नारा दिला, त्यामुळं संतप्त झालेल्या त्याच्या साथीदार अजिमुल्ला, आरिफ, ताहिद, परवेझ यानं त्याच्यावर हल्ला केला. दोघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. जीव वाचवण्यसाठी छतावर चढलेल्या बाबरला लोकांनी खाली फेकलं मृताची पत्नी फातमा हिनं सांगितलं की, पुरुषांसोबत महिलांनीही बाबरला मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी बाबर त्यांच्या घराच्या छतावर चढला. मात्र, शेजारीही तिथे पोहोचले आणि त्यांनी बाबरला छतावरून खाली फेकले. त्याच वेळी, मृताची आई, झैबुन्निशा यांनी सांगितलं की, छतावरून पडलेल्या बाबरला रामकोला सीएचसीमध्ये दाखल करण्यात आलं. तिथून त्याला जिल्हा रुग्णालयात आणि नंतर लखनऊला रेफर करण्यात आले. लखनऊमध्ये उपचारादरम्यान बाबरचा मृत्यू झाला. बाबरनं संरक्षण मागितलं पण अधिकाऱ्यांनी केलं दुर्लक्ष कुटुंबीयांनी सांगितलं की, बाबरनं रामकोला पोलीस ठाण्यातील अनेक अधिकाऱ्यांना संरक्षणासाठी आवाहन केलं होतं, परंतु त्याकडं दुर्लक्ष करण्यात आलं. रामकोला पोलीस ठाण्यात तक्रार ऐकून न घेतल्यामुळं गुंडगिरी करणाऱ्यांमध्ये आणखी बळ आलं. त्यांनी बाबरला बेदम मारहाण केली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बाबरच्या पत्नीनं रामकोला पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या कसया एसडीएम यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलं. आरोपींना अटक केली जाईल. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. प्रादेशिक आमदार पी. एन. पाठक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करण्यास होकार दिला. बाबर यांच्या पार्थिवाला प्रदेश आमदारांनी स्वतः खांदा दिला.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: BJP, Gang murder, Muslim

    पुढील बातम्या