Home /News /national /

पूजा करीत होती सैन्यात जाण्याची तयारी; मात्र आता होणार अंत्यसंस्कार...

पूजा करीत होती सैन्यात जाण्याची तयारी; मात्र आता होणार अंत्यसंस्कार...

शेवटच्या क्षणीही तिने आपल्या आईसह 5 जणांचा जीव वाचवला. मात्र ती वाचू शकली नाही.

  पाटना, 17 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh News) एक मोठा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये लग्नाच्या कार्यक्रमात विहीर पुजनाचा कार्यक्रम होता. यादरम्यान थरकाप उडवणारा प्रकार घडला. महिला विहीर पूजताना नाचू-गाऊ लागली. महिला आनंदात नाचत-गात होती. यादरम्यान त्या विहीरीच्या स्लॅबवर चढल्या. स्लॅब फार वचन घेऊ न शकल्याने सर्व महिला विहिरीत पडल्या. या अपघातात 13 जणांचा मृत्यू (Kushinagar Accident 13 Death) झाला आहे. यातील 9 मुली आणि 4 महिला आहेत. हा अपघात बुधवारी रात्री 9.30 वाजता घडला. सर्वत्र अंधार होता आणि बचावासाठी महिला ओरडत होत्या. आजूबाजूचे लोक पोहोचले, मात्र 7 मिनिटं उलटून गेले होते. यादरम्यान 5 महिलांचा तडफडून मृत्यू झाला. तर 8 जणांनी रस्त्यातच जीव सोडला. या मृतांमध्ये 21 वर्षीय पूजा यादवदेखील आहे.

  मात्र या अपघातात तिने दाखवलेलं शौर्य गावात चर्चेचा विषय आगे. ती सैन्यात भरतीची तयारी करीत होती. मात्र सिलेक्शनपूर्वीच तिचा दुर्देवी अंत झाला. मात्र मरतानाही तिने धाडस दाखवित पाच जणांचा जीव वाचवला.

  अंधारात बुडणाऱ्यांमध्ये पूजासह तिची आईदेखील होती. तिने आधी आपल्या आईला वाचवलं. यानंतर एक-एक करीत अन्य लोकांनाही बाहेर काढलं. सहाव्याला वाचवताना ती स्वत:च विहिरीत बुडाली. तिचे वडील आर्मी मॅन आहे. त्यांना मुलीच्या लग्नाची चिंता होती. मात्र आता ना सिलेक्शन ना लग्न...या विहिरीने तब्बल 13 जणांना गिळलं, असं म्हणत स्थानिकांनी शेवटच्या क्षणी पूजाच्या धाडसाचं कौतुक केलं. प्रत्यक्ष दर्शींनी सांगितलं की, पुजा सर्वांना वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. पूजाने पाच लोकांचा जीव वाचवला. सहाव्याचा जीव वाचवताना तिचं संतुलन बिघडला आणि ती स्वत:च विहिरीत पडली.

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Accident, Indian army, Uttar pradesh

  पुढील बातम्या