मराठी बातम्या /बातम्या /देश /

'कमांडो श्वान’ करणार कुनो अभयारण्यातील चित्त्यांचं संरक्षण! पाहा Video

'कमांडो श्वान’ करणार कुनो अभयारण्यातील चित्त्यांचं संरक्षण! पाहा Video

नामिबियातून भारतामध्ये आणलेल्या चित्त्यांच्या  सुरक्षेची पुरेपुर काळजी घेतली जात आहे.

नामिबियातून भारतामध्ये आणलेल्या चित्त्यांच्या सुरक्षेची पुरेपुर काळजी घेतली जात आहे.

नामिबियातून भारतामध्ये आणलेल्या चित्त्यांच्या सुरक्षेची पुरेपुर काळजी घेतली जात आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 सप्टेंबर :  तब्बल सात दशकांनंतर भारत सरकारने नामिबियातून आठ चित्ते भारतात आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: त्या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात सोडलं. भारतात आलेले हे चित्ते इथल्या पर्यावरणाशी कसं जुळवून घेणार? हा प्रश्न उपस्थित होत असतानाच त्यांच्या सुरक्षेची पुरेपुर काळजी घेण्याच्या दृष्टीनंही योग्य ती पावलं उचलली जात आहेत. चित्त्यांना शिकारी व इतर वन्य प्राण्यांपासून वाचवण्यासाठी जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानांना भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या म्हणजेच आयटीबीपीच्या हरियाणातील पंचकुला इथल्या राष्ट्रीय श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षित केलं जातंय. ‘अमर उजाला हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलंय.

भारतात चित्ते आढळल्याची शेवटची नोंद 1948 मधली आहे. त्याच वर्षी कोरियाचे राजा रामनुज सिंहदेव यांनी तीन चित्त्यांची शिकार केली होती. त्यानंतर 1952 मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचं घोषित केलं गेलं. नुकतंच काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात 8 चित्ते सोडण्यात आले. सध्या हे चित्ते विशेष देखरेखीखाली आहेत; पण अभयारण्यात सोडल्यानंतर त्यांच्या सुरक्षेवरून चिंता व्यक्त केली जात आहे.

इतर वन्य प्राणी आणि शिकाऱ्यांपासून त्यांना वाचवण्यासाठी या श्वानांना विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे. प्रशिक्षणाचा एक व्हिडिओही समोर आलाय. भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात हे प्रशिक्षण सध्या सुरू आहे. या संदर्भात बोलताना आयजी आय. एस. दुहान म्हणाले, ‘श्वानांना विशेष प्रशिक्षण देताना वाघाची कातडी आणि त्यांच्या हाडांचा शोध घेण्यासाठी प्रशिक्षित केलं जात आहे. प्रशिक्षणासाठी WWF म्हणजेच वर्ल्ड वाइल्ड फंड फॉर नेचर इंडिया या संस्थेची मदत घेतली जात आहे.’

1970 मध्येही झाले होते चित्ते आणण्यासाठी प्रयत्न

1970 मध्ये भारत सरकारनं आशियाई चित्ते इराणहून आणण्याचा प्रयत्न केला होता. या संदर्भात इराण सरकारशी बोलणंही झालं होतं. पण प्रत्यक्षात चित्ते काही भारतात आले नाहीत. नामिबियातून 8 चित्त्यांना आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले आणि त्यांना यशदेखील मिळालं. या चित्त्यांना आणून कुनो राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यातही आलं. केंद्र सरकार 5 वर्षांत 50 चित्ते आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, कुनो राष्ट्रीय अभयारण्यात चित्त्यांना आणून ठेवण्यासाठी 25 गावांतील लोकांना त्यांचं राहतं घर सोडावं लागल्याचीही माहिती आहे.

शहरात आल्यानं भेदरलेल्या गर्भवती नीलगायीचा दुर्दैवी मृत्यू, पाहा Video

दरम्यान, जर्मन शेफर्ड या श्वानांना विशेष प्रशिक्षण देतानाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. यात सहा श्वानांना आयटीबीचे जवान प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षण कार्यक्रमात श्वानांकडून विविध कसरती करून घेतल्या जात आहेत. प्रशिक्षण पूर्ण होताच सर्व श्वान कुनो अभयारण्यात सोडलेल्या 8 चित्त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात होणार आहेत.

First published:

Tags: Dog, Wild animal