कुणाल कामराने बंदी घालणाऱ्या इंडिगोला अडचणीत आणण्यासाठी पाठवली नोटीस

कुणाल कामराने बंदी घालणाऱ्या इंडिगोला अडचणीत आणण्यासाठी पाठवली नोटीस

कॉमेडियन कुणाल कामराने त्याच्यावर प्रवास करण्यास बंदी घातलेल्या इंडिगोला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी : कॉमेडियन कुणाल कामराने त्याच्यावर प्रवास करण्यास बंदी घातलेल्या इंडिगोला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मुंबई-लखनऊ विमान प्रवासावेळी पत्रकार अर्णब गोस्वामी यांना त्रास दिल्याबद्दल इंडिगोकडून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरावर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर कामराने एअरलाइन्सला नोटीस पाठवली आहे. यामध्ये बंदी हटवण्याची आणि बिनाशर्त माफी मागून 25 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

एअरलाइन्सला ही नोटीस शुक्रवारी पाठवण्यात आली आहे. यामध्ये कुणाल कामराच्या वकिलांनी म्हटलं की, कुणाल कामराला इंडिगो एअरलाइन्सच्या या निर्णयाने मानसिक त्रास झाला. तसेच भारतासह परदेशातील त्याचे ठरलेले कार्यक्रम रद्द करावे लागले. यासठी नुकसान भरपाई म्हणून 25 लाख रुपये देण्यात यावे. एअरलाइन्सची ही कारवाई अवैध आहे. हा मनमानी कारभार नियमांविरुद्ध आहे. नोटीसीवर अद्याप इंडिगोकडून उत्तर देण्यात आलेलं नाही.

कुणाल कामरावर बंदी घातल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर त्याला पाठिंबाही दिला आहे. एअर इंडियासह इंडिगोमधून प्रवास करणाऱ्यांनी फलक घेऊन तसेच टिश्श्यू पेपरवर संदेश लिहून त्याचे समर्थन करताना बंदीचा निषेध नोंदवला आहे.

इंडिगो (Indigo) मध्ये स्टँड-अप कॉमेडिअन कुणाल कामराला पत्रकाराशी गैरवर्तन करणे चांगलेच महागात पडले आहे.  पत्रकार अर्णब गोस्वामी यांना विमानात छळण्याप्रकरणी स्टँड-अप कॉमेडिअन कुणाल कामरा यांच्यावर इंडिगो एअरलाइन्सने सहा महिन्यांची बंदी घातली. इंडिगोच्या 6E 5317 फ्लाइट मध्ये  कुणाल कामराने पत्रकार अर्नब गोस्वामी यांच्यासोबत गैरवर्तन केलं होतं. कुणालने याबद्दल एक व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला होता.

आई शप्पथ, कुणाल कामरा करणार गटारातून प्रवास! सोशल मीडियावर Memes चा धुमाकूळ

First published: February 1, 2020, 5:09 PM IST

ताज्या बातम्या