पत्रकार अर्णब गोस्वामींसोबत गैरवर्तन करणं पडलं महागात, कुणाल कामरावर घातली बंदी

पत्रकार अर्णब गोस्वामींसोबत गैरवर्तन करणं पडलं महागात, कुणाल कामरावर घातली बंदी

स्टँड-अप कॉमेडिअन कुणाल कामरा यांच्यावर इंडिगो एअरलाइन्सने सहा महिन्यांची बंदी घातली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 जानेवारी : इंडिगो (Indigo) मध्ये स्टँड-अप कॉमेडिअन कुणाल कामराला पत्रकाराशी गैरवर्तन करणे चांगलेच महागात पडले आहे.  पत्रकार अर्णब गोस्वामी यांना विमानात छळण्याप्रकरणी स्टँड-अप कॉमेडिअन कुणाल कामरा यांच्यावर इंडिगो एअरलाइन्सने सहा महिन्यांची बंदी घातली आहे.

इंडिगोच्या 6E 5317 फ्लाइट मध्ये  कुणाल कामराने पत्रकार अर्नब गोस्वामी यांच्यासोबत गैरवर्तन केलं होतं. कुणालने याबद्दल एक व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला आहे.

हा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट झाल्यानंतर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियातून कुणालवर कारवाई करावी अशी मागणी पुढे आली. त्यानंतर इंडिगो (Indigo) ने या प्रकरणाची दखल घेत सहा महिन्यांची बंदी घालण्याची कारवाई केली. कुणाल कामराची वर्तवणूक स्वीकारण्यासारखी नाही, असं इंडिगो एअरलाईन्सने स्पष्ट केलं.

एअर इंडिया (Air India) ने सुद्धा कुणाल कामरा (Kunal Kamra) वर कारवाई केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत कुणाल कामरावर बंदी घालण्यात आली आहे.

कुणाल कामराच्या या वर्तवणुकीची  केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardip singh Puri) यांनी सुद्धा दखल घेतली. विमान प्रवासात प्रवाशांना त्रास देणे योग्य नाही. असा प्रकार प्रवाशांच्या सुरक्षेला धोका पोहोचवू शकतो. आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. पण इतर एअरलाईन्सनेही कुणालवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणीच पुरी यांनी केली.

परंतु, कुणाल कामराने या प्रकरणावर इंडिगो एअरलाईन्सची खिल्ली उडवली आहे. 'माझ्यावर सहा महिन्याची बंदी घालण्यासाठी धन्यवाद, प्रामाणिकपणे सांगू तर तुम्ही खूप दयाळू आहात. नरेंद्र मोदी हे एअर इंडियाला   कायम बंदी घालू शकतात.' असं कुणालने ट्वीट केलं आहे.

First Published: Jan 29, 2020 07:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading