युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत कुंभमेळा

युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत कुंभमेळा

याआधी गेल्या दोन वर्षांमध्ये योग आणि नवरोझ (पारशी नववर्ष) यांचा समावेश सांस्कृतिक वारशांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. भारतात नाशिकसह अलाहाबाद, हरिद्वार आणि उज्जैन या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो

  • Share this:

08 डिसेंबर: जगभरात प्रसिद्ध असलेल्या भारतातील कुंभमेळ्याला आता जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे. संयुक्त राष्ट्रांचा घटक असलेल्या 'युनेस्को'ने कुंभमेळा हा मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा असल्याचे जाहीर केलं आहे.

याआधी गेल्या दोन वर्षांमध्ये योग आणि नवरोझ (पारशी नववर्ष) यांचा समावेश सांस्कृतिक वारशांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. भारतात नाशिकसह अलाहाबाद, हरिद्वार आणि उज्जैन या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो. पूर्ण कुंभमेळा 12 वर्षांनी तर अर्धकुंभमेळा सहा वर्षांनी भरतो. कुंभमेळाला सांस्कृतिक वारसा हा दर्जा मिळाला असला तरी भारतात मात्र कुंभमेळ्यावर प्रचंड टीका करण्यात येते. कुंभमेळ्यात भरपूर पाणी वाया जातं, तसंच कुंभमेळ्यामध्ये काही विधायक कार्य होत नाही अशीही टीका केली जाते. अनेक साधू बैरागी कुंभमेळ्याला एकत्र येतात. गेली कित्येक वर्ष कुंभमेळे अविरतपणे चालू आहेत.

First published: December 8, 2017, 11:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading