हरिद्वार, 17 एप्रिल: देशभरातील विविध ठिकाणी कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत असतानाच हरिद्वार (Haridwar) येथे कुंभमेळ्यासाठी भाविक (Devotees) आणि साधूंनी (Saints) मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र, आता त्याचे परिणाम समोर येऊ लागले आहेत. कारण, कुंभमेळ्यात सहभागी झालेल्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या 175 साधूंची कोविड टेस्ट शनिवारी पॉझिटिव्ह आली. यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या साधूंची संख्या ही 229 इतकी झाली आहे.
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एसके झा यांनी मेडिकल बुलेटिन जाहीर करत कोरोना बाधितांची ही आकडेवारी सांगितली आहे. कुंभमेळ्यात सहभागी झाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरत आहे. यामुळे आता भाविक आणि साधूंमध्येही कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. याच दरम्यान कुंभ मेळा समाप्तीचीही घोषणा करण्यात आली आहे.
हरिद्वार येथे आयोजित महाकुंभ मेळ्यात लाखोंच्या संख्येत भाविकांनी उपस्थिती लावली होती. तर हजारोंच्या संख्येत साधूंनी उपस्थिती लावली होती. याच दरम्यान अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे साधू-संतांच्या मृत्यूचे वृत्त सुद्धा समोर आले आहे.
वाचा: हरिद्वार कुंभ समाप्तीची घोषणा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निरंजनी आखाड्याचा निर्णय
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ एसके झा यांनी सांगितले की, कुंभ मेळ्यात सहभागी झालेल्या 175 साधूंचे कोविड अहवाल आज पॉझिटिव्ह आले असून बाधित कोरोना साधूंची एकूण संख्या 229 इतकी झाली आहे. निरंजनी आखाडाने 15 दिवसांपूर्वी कुंभ मेळा समाप्तीची घोषणा केली होती त्यानंतर आता जूना आखाडाने सुद्धा कुंभ समाप्तीची घोषणा केली आहे.
हरिद्वार कुंभमेळ्यात 10 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान तब्बल 1700 हून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. आता भीती व्यक्त करण्यात येत आहे की, हाच कुंभमेळा कोरोनाचा सुपरस्प्रेडर तर ठरणार नाही ना? वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, गेल्या पाच दिवसांत कुंभ मेळा परिसरात 2,36,751 जणांची कोविड तपासणी करण्यात आली आणि त्यापैकी 1701 जणांचा अहवा पॉझिटिव्ह आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Kumbh mela