नवी दिल्ली,13 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना 'फिटनेस चँलेंज' दिलं होतं. पण 'माझ्यासाठी माझ्यापेक्षा माझ्या राज्याचे 'फिटनेस' अधिक महत्वाचे आहे असं प्रतिउत्तर कुमारस्वामींनी दिलं.
कर्नाटकचे नवनिर्वाचित मुंख्यमत्री कुमारस्वामीनी पंतप्रधान मोदी यांच्या 'फिटनेस' चॅलेंजला उत्तर देत ट्विटरवर असं म्हटलं की "मला आनंद आहे की, तुम्हाला माझ्या फिटनेसची चिंता आहे, पण मला माझ्या राज्याच्या 'डेव्हलपमेंट फिटनेस'ची जास्त चिंता आहे. आणि त्यासाठी मला तुमच्या सहकार्याची मोठ्या प्रमाणात गरज लागणार असून, मी अशी आशा करतो की माझ्या राज्याच्या विकासासाठी तुम्ही मला सहकार्य कराल".
अशा स्वरूपाचे ट्विट करून त्यानी पंतप्रधान मोंदीनी दिलेल्या 'फिटनेस' चँलेंजला उत्तर दिले आहे. त्यांनी असंही म्हटलं की, आपल्या फिटनेसवर लक्ष ठेवणे हे प्रत्येकासाठी महत्वाचेच आहे. माझ्या प्रतेक दिवसाची सुरूवात ट्रेडमील आणि योगा यानेच होत असून, दररोज वर्कआऊट करणे हा माझा नित्यनियम आहे.
पंतप्रधान मोदींनी आपल्या फिटनेसचा व्हिडिओ शुट करून बुधवारी त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे. आणि यामध्येच त्यांनी कर्नाटकच्या मुंख्यमत्री कुमारस्वामी यांना फिटनेस चॅलेंज दिले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kumarsawami, Narendra modi