S M L

जेडीएसच्या आमदारांना भाजपकडून १०० कोटींची ऑफर- एच.डी.कुमारस्वामी

मी काँग्रेससोबतच जाणार, असंही ते म्हणालेत. २००४-०५ साली आमच्या पक्षावर डाग लागला होता, तो डाग मला खोडून काढायचाय, म्हणून मी काँग्रेससोबत चाललोय, असंही ते पुढे म्हणाले.

Sonali Deshpande | Updated On: May 16, 2018 01:05 PM IST

जेडीएसच्या आमदारांना भाजपकडून १०० कोटींची ऑफर- एच.डी.कुमारस्वामी

बंगळुरू, 16 मे : जनता दल सेक्युलरच्या आमदारांना भाजपकडून १०० कोटींची ऑफर देण्यात आलीये, असा खळबळजनक आरोप केलाय जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी. मी काँग्रेससोबतच जाणार, असंही ते म्हणालेत. २००४-०५ साली आमच्या पक्षावर डाग लागला होता, तो डाग मला खोडून काढायचाय, म्हणून मी काँग्रेससोबत चाललोय, असंही ते पुढे म्हणाले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. असं असलं तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएस यांनी हातमिळवणी केली आहे. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरसह काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा दिलाय. तर दुसरीकडे सत्ता स्थापनेसाठी भाजपनं देखील जेडीएसच्या मनधरणीचा प्रयत्न करून पाहिलाय.

दरम्यान काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केलाय. तर येडियुरप्पा यांनी देखील राज्यपालांची भेट घेऊन भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा केलाय. आता राज्यपालांच्या भूमिकेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2018 01:01 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close