S M L

कर्नाटकात कुमारस्वामींनी सिद्ध केलं बहुमत, जेडीएस-काँग्रेसचं सरकार स्थापन

आजपासून कर्नाटकमध्ये जेडीएस आणि काँग्रेसचे सरकार स्थापन झाले असून कुमारस्वामी यांनी कर्नाटकच्या विधानसभेमध्ये आजच बहुमत सिद्ध केलंय, त्यामुळे यापुढे आता कर्नाटक राज्यावर जेडीएस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची सत्ता असणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: May 25, 2018 04:33 PM IST

कर्नाटकात कुमारस्वामींनी सिद्ध केलं बहुमत, जेडीएस-काँग्रेसचं सरकार स्थापन

बंगळुरू, २५ मे : गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकमध्ये ज्या नाट्यमय राजकीय घडामोडी सुरू होत्या त्यांचा आता दि एन्ड झालाय. आजपासून कर्नाटकमध्ये जेडीएस आणि काँग्रेसचे सरकार स्थापन झाले असून कुमारस्वामी यांनी कर्नाटकच्या विधानसभेमध्ये आजच बहुमत सिद्ध केलंय, त्यामुळे यापुढे आता कर्नाटक राज्यावर जेडीएस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची सत्ता असणार आहे.

आजच्या बहुमत चाचणीमध्ये 117 आमदारांनी कुमारस्वामी सरकारच्या बाजूने मतदान केलं असून रमेश कुमार यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलीय. बहुमत चाचणीचं मतदान हे आवाजी मतदानाने पार पडलं.दरम्यान या मतदानावर भाजपने मात्र बहिष्कार टाकत भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला तर दुसरीकडे हे बहुमत सिद्ध होत असतानाच येडियुरप्पा यांनी येत्या 28 तारखेला कर्नाटक बंदची हाक दिलीय.

कुमारस्वामी सरकारने शेतकऱ्यांना त्वरित कर्ज माफी द्यावी अशी मागणी करत त्यांनी हा बंद पुकारलाय, त्यामुळे यापुढे कुमारस्वामी सरकार स्थानापन्न झालं असल तरी सरकार आणि विरोधक म्हणजेच भाजप यांच्यातला संघर्ष यापुढे कर्नाटक राज्यात पाहायला मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 25, 2018 04:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close