S M L

कुमारस्वामींनी घेतली सोनिया गांधींची भेट, शपथविधीला येण्याचं दिलं निमंत्रण

Sachin Salve | Updated On: May 21, 2018 08:37 PM IST

कुमारस्वामींनी घेतली सोनिया गांधींची भेट, शपथविधीला येण्याचं दिलं निमंत्रण

नवी दिल्ली, 21 मे : कर्नाटकमध्ये काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन करणारे जेडीएसचे नेते कुमारस्वामी आज नवी दिल्लीत पोहोचले. त्यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेऊन शपथविधीला येण्याचे निमंत्रण दिले.

जेडीएसचे नेते कुमारस्वामी बुधवारी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. आज कुमारस्वामींनी दिल्लीत येऊन सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट घेतली.  याआधी कुमारस्वामींनी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांची भेट घेतली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री पदासह सर्व विषयांचा खुलासा उद्या होईल. सचिव के. वेणुगोपाल राहुल गांधी यांच्याशी सत्ता वाटप संदर्भात चर्चा करताय अशी माहिती कुमारस्वामींनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2018 08:35 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close