संतापजनक; हिमाचलमध्ये मतदान केंद्राजवळ 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 20, 2019 11:24 AM IST

संतापजनक; हिमाचलमध्ये मतदान केंद्राजवळ 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

शिमला, 20 मे: हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदान केंद्राजवळ एका 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधिक मुलीच्या आईने यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

कुल्लू जिल्ह्यातील आनी येथील आहे. आनी येथील पोलिस ठाण्यात 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. 19 मे रोजी म्हणजेच रविवारी आनी येथे लोकसभेसाठी मतदान झाले. यासाठी एका शाळेत मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. या शाळेच्या मैदानावर पीडित मुलगी मैत्रिणींसह खेळत होती. मुलीची आई शेतात काम करण्यासाठी गेली होती. मुलीसोबत तिचे आज्जी-आजोबा होते. याच दरम्यान आरोपी मुलीला 10 रुपये दिले आणि जवळच्या दुकानातून कुरकुरे आणण्यास सांगितले. जेव्हा मुलगी दुकानाकडे जात होती तेव्हा रस्त्यात संबंधित आरोपीने तिला आडवले आणि बलात्कार केला.

पोलिसांनी संबंधित आरोपीची ओळख देवेंद्र सिंह अशी करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्यावर पॉक्सो कायदा कलम 376 आणि कलम 511 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर पीडित मुलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणाचा तपास डीसीपी तेजेंद्र वर्मा हे करत आहेत.


VIDEO: 'आमची बदनामी करू नका', जवानानं तृणमूलच्या खासदाराला सुनावलं

Loading...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2019 11:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...