J&K : सुरक्षादलांनी कॉन्स्टेबल शहीद सलीम शहा यांच्या हत्येचा 'असा' घेतला बदला

J&K : सुरक्षादलांनी कॉन्स्टेबल शहीद सलीम शहा यांच्या हत्येचा 'असा' घेतला बदला

श्रीनगरपासून 70 किलोमीटरवर असलेल्या कुलगाम जिल्ह्यात ही महत्वाची कारवाई केली गेली आहे.

  • Share this:

जम्मू काश्मीर, 22 जुलै : जम्मू आणि काश्मीरमध्ये आज सकाळी सुरक्षा यंत्रणांनी 3 दहशतवाद्यांना ठार केलंय. श्रीनगरपासून 70 किलोमीटरवर असलेल्या कुलगाम जिल्ह्यात ही महत्वाची कारवाई केली गेली आहे. लष्कर, सीआरपीएफ आणि पोलीस, या तीन यंत्रणांनी मिळून ही कारवाई केली आहे आणि त्यात 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी त्यांना यश आलं आहे. काल संध्याकाळी एका प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. सलीम शहा असं या पोलिसाचं नाव आहे. त्याची हत्या जिथे झाली, तिथून काही अंतरावरच ही चकमक सुरू होती. एकूण 4 दहशतवादी लपून बसलेत, अशी माहिती गुप्तचर खात्यानं लष्कराला दिली. त्यानंतर त्वरित कुलगामच्या बुधवानीमध्ये ही कारवाई सुरू झाली.

'जीएसटी'त झाला बदल, 'या' 36 वस्तू झाल्या स्वस्त !

जम्मू काश्मीरचे डीजीपी एसपी वैद्या यांनी केलेल्या ट्विटनुसार, या हल्ल्यात 3 दहशतवाद्यांचे मृतदेह आणि 3 हत्यारं ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यांनी पुढे लिहलं की, 'कुलगाममध्ये आमचे सहकर्मी कॉन्स्टेबल सलीम शहा यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली.' सुरक्षा दलांकजून यात हत्येचा कडाडून बदला घेण्यात आला आहे.

याआधी हिजबुल मुजाहिदीन (एस.एम.) यांचे शव शनिवार शाळेतील कुलगाम जिल्ह्यातल्या एका घरातून कॉन्स्टेबल सलीम शहाने अपहरण केले होते. शनिवारी कुलगाम जिल्ह्यातील एका घरातून कॉन्स्टेबल सलीम शहा याचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. सुट्टीघेऊन सलीम शहा त्यांच्या घरी मुतालहामामध्ये आले होते. आणि तिथे दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण केलं. त्यानंतर रेजवानी पयीन गावात एका नर्सरीजवळून त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

हेही वाचा...

नववीत शिकणाऱ्या मुलीवर पाशवी बलात्कार करून खून

नवी शंभराची नोट आरबीआयला पडली 100 कोटींना !

भाजपचा नराधम नगरसेवक,लग्नासाठी तरुणीवर 5 वर्ष केले लैंगिक अत्याचार!

First published: July 22, 2018, 9:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading