उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्या प्रकरणात कुलदीप सेंगरला 10 वर्षांची शिक्षा

उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्या प्रकरणात कुलदीप सेंगरला 10 वर्षांची शिक्षा

कोर्टाकडून शिक्षा सुनावली जात असताना पोलीस अधिकारी ढसाढसा रडत होता, तर सेंगरने मी चुकलो असेल तर डोळ्यात अॅसिड घाला असं म्हणत होता

  • Share this:

लखनऊ, 13 मार्च : उन्नाव बलात्कार प्रकरणात (Unnao Rape Case) दोषी असलेला भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंग सेंगर (MLA Kuldeep Sengar) यांच्यासह 7 जणांना उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्या प्रकरणात आज कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. यामध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

उन्नाव बलात्कार पीडिताच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी कुलदीपसिंग सेंगरसह सात दोषींना 10 वर्षांची शिक्षा (10 yrs imprisonment) सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टानेही 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंडाची रक्कम पीडितेला देण्यात येईल, असेही कोर्टाने य़ावेळी सांगितले आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेशातील दोन पोलीस अधिकाऱ्यांनाही  शिक्षा सुनावण्यात आली आहेत. एक त्यावेळी माखी पोलीस ठाण्याचे एसएचओ होते, तर दुसरे त्यावेळी माखी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक होते.

भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगर, तत्कालिन माखी ठाण्याचे सबइन्स्पेक्टर कामता प्रसाद, तत्कालिन माखी ठाणाचे एसएचओ अशो सिंह भदौरिया, विनय शर्मा, बीरेंद्र सिंह उर्फ बऊवा सिंह, शशी प्रताप सिंह उर्फ सुमन सिंह, जयदीप सिंह उर्फ अतुल सिंह यांना प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

संबंधित - उन्नाव बलात्कार प्रकरणात आमदार कुलदीप सिंग सेंगरला कोर्टाने सुनावली जन्मठेप

आयपीसी कलम 304 (खून), 120 बी (षड्यंत्र), 166 (लोकसेवका जो आपले कर्तव्य बजावत नाही), 167 (हेतूपुरस्सर एखाद्याचे नुकसान करणे), 193 (खोटे पुरावे सादर करणे), 201 (गुन्हा करुन पुरावा लपवणे), 203 (खोटी माहिती देणे), 211 (हानी पोहचवण्याच्या उद्देशाने दुसर्‍यावर खोटे आरोप लावणे), 218 (सार्वजनिक सेवेद्वारे खोटे पुरावे सांगणे), 323 (मुद्दाम एखाद्याला दुखापत केल्याबद्दल दंड) आदी दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याला तीस हजारी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

उत्तर प्रदेशातल्या सत्ताधारी आमदारानेच बलात्कार केल्याने प्रचंड वाद निर्माण झाला होता. उन्नाव इथे जून 2018 मध्ये एका महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. हा बलात्कार कुलदीप सिंग सेंगरने केल्याचा आरोप पीडितेने केला होता. या प्रकरणात पोलिसांकडे सर्व पुरावे असतानाही अटक करण्यास टाळाटाळ केली गेली होती. अखेर अलाहाबाद हायकोर्टाने दिल्यानंतर सेंगरला अटक केली होती.

संबंधित - उन्नाव बलात्कार पीडितेच्या अपघातात अभिनेत्रीने केलं भाजप आमदाराचं समर्थन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2020 12:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading