'हे खरं आहे आणि तेच तू सांग', कुलभूषणना आईनं खडसावलं

आईशी बोलत असताना कुलभूषण पाकिस्ताननं केलेल्या आरोपांचा पाढा वाचू लागले. तेव्हा त्यांच्या आईनं त्याला खडसावलं.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 28, 2017 09:57 AM IST

'हे खरं आहे आणि तेच तू सांग', कुलभूषणना आईनं खडसावलं

28 डिसेंबर : भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव आणि त्याच्या कुटुबींयाच्या भेटीत काय काय घडलं, याची माहिती आता बाहेर येतेय. आईशी बोलत असताना कुलभूषण पाकिस्ताननं केलेल्या आरोपांचा पाढा वाचू लागले. तेव्हा त्यांच्या आईनं त्याला खडसावलं. 'तू हे सगळं का बोलतोयस. तू इराणमध्ये व्यवसाय करत होतास आण तिथेच तुझं अपहरण झालं. हे खरं आहे आणि तेच तू सांग.' असं त्यांच्या आईनं त्यांना खडसावलं. यामुळे, या दोघांचं संभाषण रेकॉर्ड करून ते जगासमोर आणायचा पाकचा कुटील डाव फसला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं या बातमीचा खुलासा केला आहे.

पाहूयात कुलभूषणच्या आईनं नेमकं काय म्हटलंय?

'पण तू हे सगळं का बोलतोयस ? व्यवसाय करण्यासाठी तू इराणमध्ये होतास आणि तिथेच तुझं अपहरण झालं. तू खरं काय ते सागितलंच पाहिजेस.'

या भेटीत कुलभूषण जाधवांच्या कुटुंबीयांना पाकिस्ताननं अतिशय वाईट वागणूक दिली आहे. याच मुद्द्यावर आज परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज लोकसभेत सविस्तर उत्तर देणार आहेत. तशी घोषणा त्यांनी काल सभागृहात केली होती. संसदेत काल कुलभूषण यांच्या मुद्द्यावरून शिवसेना, काँग्रेस आणि तृणमूलचे मंत्री आक्रमक झाले होते. कुलभूषणची आई आणि पत्नीला अपमानास्पद वागणूक देणं, पत्नीला मंगळसूत्र काढायला लावणं, आईला मराठीत बोलू न देणं. या सगळ्यावर भारतानं कडक आक्षेप घेतला आहे. या सगळ्यावर आता सुषमा काय भाष्य करतील, याकडेच सगळ्यांच लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2017 08:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...