कुलभूषण यांची फाशी रद्द करा, आईची पाककडे मागणी

कुलभूषण यांची फाशी रद्द करा, आईची पाककडे मागणी

कुलभूषण जाधव यांच्या फाशीविरोधात त्यांची आईंनी पाकिस्तानच्या अपिलीय कोर्टात अपिल केले आहे.

  • Share this:

27 एप्रिल :  पाकिस्तानातील लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क साधण्याची मागणी भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानकडे केली आहे. कुलभूषण जाधव यांची फाशी रद्द करा', यासाठी त्यांच्या आईने केलेले अपील भारताने पाकिस्तानकडे सुपूर्द केले आहे. कुलभूषण जाधव यांच्या फाशीविरोधात त्यांची आईंनी पाकिस्तानच्या अपिलीय कोर्टात अपिल केले आहे.

पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने हेरगिरी प्रकरणी जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. यानंतर भारत-पाकमधील संबंध ताणले गेलेत. दरम्यान, कुलभूषण जाधव प्रकरणी वकील देण्याची मागणी भारताने केली होती. पण पाकिस्तानने आज पुन्हा ही मागणी धुडकावून लावली आहे. कुलभूषण जाधववर हेरगिरी प्रकरणी कारवाई झाली आहे. यामुळे द्वीपक्षीय संबंधानुसार जाधवना वकील देता येणार नाही, असं उलट उत्तर पाकने दिलं आहे. जाधव यांना वकील मिळावा यासाठी पाकिस्तानमधील भारताचे उच्चायुक्त गौतम बंबवाले यांनी आज इस्लामाबादमध्ये पाकच्या परराष्ट्र सचिव तेहमिना जांजुआ यांची भेट घेतली.  19 एप्रिलला या दोन अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेविरोधात अपिल करण्याची मागणीही बंबवाले यांनी या भेटीत केली. पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी भारतीय उच्चायुक्त गौतम बंबवाले यांच्या मागण्या फेटाळल्या.

पाक लष्कराने यापूर्वीच कुलभूषण जाधवना वकील देण्यास नकार दिला आहे. अशातच पाक सरकारने पुन्हा भारत सरकारची मागणी फेटाळली. यामुळे पाकिस्तानचे कोर्ट कुलभूषण जाधव यांच्या आईच्या याचिकेवर काय निकाल देणार याकडे आता भारताचं लक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2017 10:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...