Home /News /national /

कुलभूषण जाधव तणावात; भारताने पाकिस्ताबाबत केला आणखी एक मोठा खुलासा

कुलभूषण जाधव तणावात; भारताने पाकिस्ताबाबत केला आणखी एक मोठा खुलासा

भारतीय अधिकाऱ्यांनी आज कुलभूषण जाधव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाकिस्तानबाबत मोठा खुलासा केला आहे

    नवी दिल्ली, 16 जुलै : पाकिस्तानात मृत्यूची शिक्षा भोगणारे भारतीय कुलभूषण जाधव यांच्याशी गुरुवारी भारतीय राजकीय अधिकाऱ्यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान भारतीय विदेश मंत्रालयाने आणखी एक माहिती दिली आहे. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी कुलभूषण जाधव यांच्यासोबत बेरोकटोक आणि अटींशिवाय मुलाखत करू दिली नाही. विदेश मंत्रालयाने सांगितले की कुलभूषण जाधवला भेट घेतलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाखतीदरम्यान पाकिस्तानी अधिकारी दरडावण्याच्या भूमिकेत तेथे उपस्थित होते. इतकचं नाही जाधव यांच्यासोबत केलेले संभाषण देखील कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं जात होतं. जाधव तणावात दिसत होते आणि त्यांनी कौन्सिलर यांना याचे स्पष्ट संकेत दिले. हे वाचा-PM मोदींचा षट्कार; चिनी कंपन्यांचे तब्बल 800 कोटी रुपये पाण्यात पाकिस्तानच्या तुरुंगातली भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणात भारत सरकारने पाकिस्तानला सांगितले की ते कोणत्याही अटीशर्थी विना कुलभूषण जाधवला भेटू द्यावे. पाक सरकारच्या सूत्रांनुसार जर सर्व अटी पूर्ण झाल्या तर भारत पहिल्यांदा तपास करेल. भारताने सांगितले की आमची इच्छा आहे की पाकिस्तानने दोन अधिकाऱ्यांना कुलभूषणला भेटण्याची परवानगी द्यावी. मात्र पाकिस्तानने या नियमांचे पालन केलं नाही. उलटपक्षी पाकिस्तानने ही भेट कॅमेरात रेकॉर्ड केली. त्याशिवाय पाकिस्तानी अधिकाऱ्यांची वृत्ती ही धमकावण्याची आणि घाबरवण्याची होती, असेही भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या