कुलभूषण जाधव यांचा जीव वाचू शकतो पण पाकिस्तानातून सुटका नाही

कुलभूषण जाधव यांचा जीव वाचू शकतो पण पाकिस्तानातून सुटका नाही

पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी आज संध्याकाळी साडेसहा वाजता निर्णय येणार आहे. पाकिस्तानी लष्कराच्या कोर्टाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिलं होतं. आज येणाऱ्या निकालामध्ये कुलभूषण जाधव आणि भारताला काहीसा दिलासा मिळू शकतो.

  • Share this:

ज़ाका जैकब

नवी दिल्ली, 17 जुलै : पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी आज संध्याकाळी साडेसहा वाजता निर्णय येणार आहे. पाकिस्तानी लष्कराच्या कोर्टाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिलं होतं. आज येणाऱ्या निकालामध्ये कुलभूषण जाधव आणि भारताला काहीसा दिलासा मिळू शकतो.

हा निकाल जर भारताच्या बाजूने आला तर नक्कीच भारतासाठी हा मोठा विजय असेल. पण कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानातून सुटका करणं मात्र इतकं सोपं नाही. या प्रकरणी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कायदे आणि करार धाब्यावर बसवले आहेत. पाकिस्तानने यामध्ये व्हिएन्ना कराराचंही उल्लंघन केलं आणि कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत मिळू दिली नाही. एवढंच नाही तर त्यांची आई आणि पत्नीशाही त्यांना काचेच्या बंद खोलीतून संभाषण करावं लागलं.

व्हिएन्ना कराराचं उल्लंघन

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 ला बलुचिस्तानमध्ये ताब्यात घेतलं, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानने त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.भारताने या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली. आता भारतापुढे आशा ठेवणं आणि वाट पाहण्याशिवाय काहीच पर्याय नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालय आता मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांची फाशी रद्द करून त्याचं दुसऱ्या शिक्षेत रूपांतर करू शकतं. त्याचसोबत पाकिस्तानच्या हद्दीमध्ये कुलभूषण जाधव यांना जिवंत ठेवण्याची हमी देऊ शकतं. पण कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानमधून सुटका होण्याची शक्यता फारच कमी आहे.हे सगळे अडथळे पार करून भारत जर कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवू शकला तरी ते एक मोठं यश असेल.

25 मार्च 2016 : कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली.

काय होतं हे प्रकरण?

10 एप्रिल 2017 : पाकिस्तान लष्कराच्या कोर्टाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली.

8 मे 2017 : भारताने याबद्दल आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली.

15 मे 2017 : या खटल्याची सुनावणी झाली.

18 मई 2017: आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली.

25 डिसेंबर 2017: कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीने त्यांची भेट घेतली.

28 डिसेंबर 2017: परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या भेटीबदद्ल संसदेत माहिती दिली.

=======================================================================================================

VIDEO: सत्ता असूनही सेनेचा मोर्चा; विरोधकांचा हल्लाबोल, यासोबत टॉप 18 बातम्या

First published: July 17, 2019, 5:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading