कुलभूषण जाधव खटल्यात काही दिवसांत येऊ शकतो निर्णय

पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय हवाई दलाचे अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबदद्ल काही आठवड्यांत निर्णय येऊ शकतो. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी याबद्दल टिप्पणी केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2019 06:31 PM IST

कुलभूषण जाधव खटल्यात काही दिवसांत येऊ शकतो निर्णय

नवी दिल्ली, 4 जुलै : पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय हवाई दलाचे अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबदद्ल काही आठवड्यांत निर्णय येऊ शकतो. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी याबद्दल टिप्पणी केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय कोर्ट काही दिवसांतच या खटल्याचा निर्णय देऊ शकतं. आता फक्त तारीख जाहीर होणं बाकी आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात याबद्दलचा निर्णय येऊ शकतो. 47 वर्षांचे कुलभूषण जाधव यांना एप्रिल 2017 मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

कुलभूषण जाधव हे भारताचे हेर असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. कुलभूषण जाधव हे भारताचे नागरिक आहेत. पाकिस्तानची गुप्चतर यंत्रणा आयएसआय ने कुलभूषण जाधव यांना इराणमध्ये ताब्यात घेतलं होतं.

आतापर्यंत काय घडलं ?

Loading...

25 मार्च 2016 : कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली.

10 एप्रिल 2017 : पाकिस्तान लष्कराच्या कोर्टाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली.

8 मे 2017 : भारताने याबद्दल आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली.

15 मे 2017 : या खटल्याची सुनावणी झाली.

18 मई 2017: आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली.

25 दिसंबर 2017: कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीने त्यांची भेट घेतली.

28 दिसंबर 2017: परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या भेटीबदद्ल संसदेत माहिती दिली.

प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप करणारे लक्ष्मण माने करणार काँग्रेसमध्ये प्रवेश?

कुलभूषण जाधव यांची फाशी रद्द व्हावी यासाठी भारताने वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात सापडला. पण त्याची सुखरूप सुटका झाली. या घटनेनंतरही कुलभूषण जाधव यांच्या खटल्याबद्दल भारतात चर्चा झाली.आता याबद्दलच्या निर्णयाची सगळ्यांना प्रतीक्षा आहे.

=========================================================================================================

मुर्दाड सरकार! तडे गेलेल्या 'या' धरणाला ताडपत्रीची ठिगळं, इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 06:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...