News18 Lokmat

कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा, फाशीच्या शिक्षेला स्थगिती

पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टाने निकाल दिला आहे. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं आहे, असंही आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2019 07:22 PM IST

कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा, फाशीच्या शिक्षेला स्थगिती

हेग, नेदरलँड्स, 17 जुलै : पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टाने निकाल दिला आहे. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं आहे, असंही आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हटलं आहे. पाकिस्तानी लष्कराच्या कोर्टाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिलं होतं.

या प्रकरणी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कायदे आणि करार धाब्यावर बसवले होते. पाकिस्तानने यामध्ये व्हिएन्ना कराराचंही उल्लंघन केलं आणि कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत मिळू दिली नाही. एवढंच नाही तर त्यांची आई आणि पत्नीशाही त्यांना काचेच्या बंद खोलीतून संभाषण करावं लागलं. पण आता मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर, भारतीय दूतावास कुलभूषण जाधव यांना वकील देऊ शकतं.

व्हिएन्ना कराराचं उल्लंघन

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 ला बलुचिस्तानमध्ये ताब्यात घेतलं, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानने त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.भारताने या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली.

25 मार्च 2016 : कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली.

काय होतं हे प्रकरण?

10 एप्रिल 2017 : पाकिस्तान लष्कराच्या कोर्टाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली.

8 मे 2017 : भारताने याबद्दल आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली.

15 मे 2017 : या खटल्याची सुनावणी झाली.

18 मई 2017: आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली.

25 डिसेंबर 2017: कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीने त्यांची भेट घेतली.

28 डिसेंबर 2017: परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या भेटीबदद्ल संसदेत माहिती दिली.

 

============================================================================================================

VIDEO : हाफिज सईद अटक प्रकरणावर उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2019 06:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...