कुलभूषण जाधव यांना सोडवण्यासाठी पाकिस्तानशी बॅक-चॅनल चर्चा: हरीश साळवे

कुलभूषण जाधव यांना सोडवण्यासाठी पाकिस्तानशी बॅक-चॅनल चर्चा: हरीश साळवे

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या कोर्टानं एप्रिल 2017मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्ताननं त्यांच्यावर भारताचे हेरगिरी असल्याचा आरोप केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 मे : पाकिस्तानी (Pakistan) तुरुंगात कैद असलेले भारतीय नागरिक आणि माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांना परत आणण्यासाठी बॅक चॅनलवरून सरकारला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न झाला असल्याचाय खुलासा हरीश साळवे यांनी केला आहे. या प्रकरणात साळवे आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) भारतीय समुपदेशक होते. ते भारताचे माजी सॉलिसिटर जनरल देखील आहेत. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या कोर्टानं एप्रिल 2017मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्ताननं त्यांच्यावर भारताचे हेरगिरी असल्याचा आरोप केला आहे.

'या' आधारे सोडण्याची झाली होती चर्चा

इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, एका प्रश्नाच्या उत्तरात हरीश साळवे लंडनहून म्हणाले की, 'आम्ही आशा केली की जर मागच्या दाराने त्यांनी पाकिस्तानशी चर्चा केली तर आम्ही त्यांना पटवून देऊ. आम्ही त्यांना मानवतेच्या आधारे सोडून देण्याविषयी बोलत होतो. पण तसं झालं नाही. वास्तविक कुलभूषण जाधव यांचं प्रकरण पाकिस्तानसाठी प्रतिष्ठेचा विषय बनलं होतं.'

मेच्या पहिल्या आठवड्यात कोसळणार संकट, बंगालच्या खाडीत घोंगावतंय चक्रवाती वादळ

आतापर्यंत या प्रकरणात काय घडलं आहे?

कुलभूषण जाधव हे 2016 पासून पाकिस्तानच्या तुरूंगात आहेत. कुलभूषण जाधव हे हेरगिरी करणारा असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. पण हा दावा भारतानं बर्‍याच वेळा नाकारला आहे. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली पाकिस्तानी सुरक्षा दलांनी 3 मार्च 2016 रोजी बलुचिस्तानला कुलभूषण यांना अटक केली. सन 2017 मध्ये भारतानं आयसीजेकडे हे प्रकरण सोपावलं. गेल्या वर्षी जुलै महिन्यात कोर्टानं पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांना कॉन्सुलर प्रवेश (Consular Access)देण्याची आणि फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्यास सांगितलं.

मोहम्मद शमीचा खळबळजनक खुलासा, तीन वेळा केला होता आत्महत्या करण्याच्या विचार

पुन्हा आयसीजेला भेट देण्यावर विचार

साळवे म्हणतात की, 'आता आपण पुन्हा आयसीजेला जावं की नाही याचा विचार करत आहोत. वास्तविक, पाकिस्तानने अद्याप या संदर्भात कोणतेही पाऊल उचललेलं नाही. ते म्हणाले की, पाकिस्तानने अद्याप यासंदर्भात एफआयआरची प्रत सामायिक केलेली नाही. त्याशिवाय पाकिस्तानकडून आरोपपत्रांची प्रतदेखील पुरविली गेलेली नाही. वारंवार असं सांगूनही की पाकिस्तानकडून पुरावा देण्यात येत नाही.'

संपादन - रेणुका धायबर

First published: May 3, 2020, 10:26 AM IST

ताज्या बातम्या