कुलभूषण जाधव प्रकरणी उद्या संध्याकाळी 6: 30 वाजता येणार निकाल

कुलभूषण जाधव प्रकरणी उद्या संध्याकाळी 6: 30 वाजता येणार निकाल

पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय हवाई दलाचे अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबदद्ल उद्या निकाल येऊ शकतो. 47 वर्षांचे कुलभूषण जाधव यांना एप्रिल 2017 मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता हा निकाल येण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 जुलै : पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय हवाई दलाचे अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबदद्ल उद्या निकाल येऊ शकतो. 47 वर्षांचे कुलभूषण जाधव यांना एप्रिल 2017 मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

उद्या म्हणजे 17 जुलैला, बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजता आंतरराष्ट्रीय न्यायालयया प्रकरणी निकाल देणार आहे.पाकिस्तानने अजून तरी कुलभूषण जाधव यांनी कौन्सिलर अ‍ॅक्सेस दिलेला नाही. याचवर्षी 18 ते 21 फेब्रुवारी दरम्यान या प्रकरणाची सुनावणी झाली होती.

कुलभूषण जाधव हे भारताचे हेर असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. कुलभूषण जाधव हे भारताचे नागरिक आहेत. पाकिस्तानची गुप्चतर यंत्रणा आयएसआय ने कुलभूषण जाधव यांना इराणमध्ये ताब्यात घेतलं होतं.

इमारतीच्या ढिगारातून महिलेला बाहेर काढतानाचा LIVE VIDEO

भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टात आपली बाजू ठामपणे मांडली आहे. कुलभूषण जाधव यांच्यावर हेर असल्याचे चुकीचे आरोप आहेत. त्याचप्रमाणे कुलभूषण जाधव यांनी कौन्सिलर अ‍ॅक्सेस न देणं हे व्हिएन्ना कराराच्या विरुद्ध आहे, असंही भारताने या कोर्टात सांगितलं. या खटल्यात पारदर्शकता हवी, अशी मागणीही भारताने केली होती. आता कायदेतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा निकाल भारताच्या बाजूने येऊ शकतो.

आतापर्यंत काय घडलं ?

25 मार्च 2016 : कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली.

10 एप्रिल 2017 : पाकिस्तान लष्कराच्या कोर्टाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली.

8 मे 2017 : भारताने याबद्दल आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली.

15 मे 2017 : या खटल्याची सुनावणी झाली.

18 मई 2017: आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली.

25 डिसेंबर 2017: कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीने त्यांची भेट घेतली.

28 डिसेंबर 2017: परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या भेटीबदद्ल संसदेत माहिती दिली.

कुलभूषण जाधव यांची फाशी रद्द व्हावी यासाठी भारताने वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात सापडला. पण त्याची सुखरूप सुटका झाली. या घटनेनंतरही कुलभूषण जाधव यांच्या खटल्याबद्दल भारतात चर्चा झाली.आता याबद्दलच्या निर्णयाची सगळ्यांना प्रतीक्षा आहे.

==================================================================================================

VIDEO : मुलांना मांडीवर घेऊन वाचवलं अन् तिने मृत्यूला कवटाळलं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 07:21 PM IST

ताज्या बातम्या