मुख्यमंत्री फडणवीस कर्नाटकात राजकीय भूकंप करणार? काँग्रेस आमदार अमित शहांच्या भेटीला

मुख्यमंत्री फडणवीस कर्नाटकात राजकीय भूकंप करणार? काँग्रेस आमदार अमित शहांच्या भेटीला

मंत्रिमंडळ विस्तारानंतर कुमारस्वामी सरकारमधील रमेश जारकीहोळी यांचं मंत्रिपद काढून घेण्यात आलं. त्यानंतर नाराज झालेले जारकीहोळी भाजपच्या संपर्कात आहेत.

  • Share this:

बंगळुरू, 29 डिसेंबर : कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग आला आहे. कारण काँग्रेसचे नाराज आमदार रमेश जारकीहोळी हे भाजप अध्यक्ष अमित शहांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे, अशी माहिती 'न्यूज18 लोकमतला' सूत्रांकडून मिळाली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर कुमारस्वामी सरकारमधील रमेश जारकीहोळी यांचं मंत्रिपद काढून घेण्यात आलं. त्यानंतर नाराज झालेले जारकीहोळी भाजपच्या संपर्कात आहेत. 12 समर्थक आमदारांची नाव घेऊन जारकीहोळी दिल्लीत दाखल झाल्याने कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.

भाजपचे माजी मुख्यमंत्री एडियुरप्पा हेदेखील नवी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे कर्नाटकची राजकीय खलबतं नवी दिल्लीत सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे नाराज आमदार रमेश जारकीहोळी यांच्या दाव्यानुसार 12 आमदार भाजपला पाठिंबा देणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, कर्नाटक विधासभेच्या 224 जागांपैकी 222 जागांवर काही महिन्यांपूर्वी निवडणूक झाली. त्यात भाजपला 104, काँग्रेसला 78 तर जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने युती करत सत्ता मिळवली. जेडीएसचे एचडी कुमारस्वामी हे कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान आहेत.

VIDEO : लोकसभेत तलाक विधेयकावर सुप्रिया सुळे म्हणाल्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2018 12:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading