पंजाबचे माजी डीजीपी केपीएस गिल यांचं निधन

पंजाबचे माजी डीजीपी केपीएस गिल यांचं निधन

1984नंतर पंजाबमध्ये फोफावलेला दहशतवाद संपवण्यात गिल यांचा सिंहाचा वाटा होता.

  • Share this:

26 मे : पंजाबचे माजी डीजीपी केपीएस गिल यांचं आज ( 26 मे 17 )  निधन झालं. ते 82 वर्षांचे होते.  1984नंतर पंजाबमध्ये फोफावलेला दहशतवाद संपवण्यात गिल यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या आणि ज्युलिओ रिबोरोंच्या नेतृत्वात खलिस्तानी चळवळ नष्ट झाली आणि पंजाब अखेर शांत झालं.

गिल यांची हुशारी, प्रामाणिकपणा, कर्तबगारी आणि दूरदृष्टीमुळे पंजाब शांत झालं आणि पुन्हा प्रगतीपथावर आलं. 18 मे रोजी त्यांना दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना किडनीचा आजार होता. त्यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्यानं झालं.

1995 साली गिल सेवेतून निवृत्त झाले, पण त्या आधीच म्हणजे 1989मध्ये पद्मश्री देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं. ते हाॅकी फेडरेशनचे अध्यक्षही होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2017 05:28 PM IST

ताज्या बातम्या